- मयूर पठाडेवर्षातून किती वेळा तुम्ही बाहेर पडता? ‘बाहेर पडता’ म्हणजे आपल्या सगळ्या चिंत, काळज्या आणि रोजच्या दगदगीतून बाहेर पडून मोकळ्या वातावरणात तुम्ही कधी जाता? स्वत: तसेच आपल्या कुटुंबियांसमवेत?तसं जर तुम्ही जात नसाल, म्हणजे आपलं रुटिन जर तुम्ही सोडत नसाल, त्या चक्रातून अधूनमधून बाहेर पडण्याची तुम्हाला गरज आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे आपल्या मनावर आणि शरीरावर आलेला जो गंज असतो ना, तो निघतो आणि आपण जरा मोकळा श्वास घेतो. निदान या मोकळ्या श्वासासाठी तरी अधूनमधून आपण बाहेर पडायला हवं..अर्थात ‘चला आता बाहेर पडू या’ असं करण्यापेक्षा या आऊटिंगचं थोडं प्लॅनिंग केलं तर आपलं हे बाहेर पडणं सार्थकी लागू शकतं.प्रवासाच्या या काही टिप्स..१- प्रवासाला तर आवर्जुन जाच, वर्षातून किमान एकदा तरी आपल्या रोजच्या चक्रातून बाहेर पडून निवांतपणे बाहेर पडायलाच हवं. सगळ्या चिंता आणि काळज्या बाजूला सोडून.२- प्रवासाला जाण्यापूर्वी कितीही हटके ठिकाण तुम्ही निवडलेलं असलं तरी अगोदर त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावाधाव वाचेल आणि प्रवासाचाही खºया अर्थानं आनंद घेता येईल.३- आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण घराबाहेर पडताना जितकं जास्त सामान घेता येईल, तितकं सामान सोबत घेतात. पण इथेच बºयाच जणांचं चुकतं. याऊलट जितकं कमीत कमी सामान आपल्याबरोबर घेता येईल, तेवढंच सोबत ठेवायला हवं. अत्यावश्यक गोष्टी मात्र सोबत हव्यातच.४- ज्या ठिकाणी आपण जाणार असू, तिथे शक्यतो दिवसाउजेडीच आपण पोहोचू याच हिशेबानं सारं प्लॅनिंग करायला हवं.५- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाताहात, तिथल्या स्थानिक लोकांशी तुमचा परिचय असेल, कोणी ओळखीचं असेल तर त्याचा सल्ला अवश्य घ्या.या गोष्टी तुमच्या प्रवासाला चार चॉँद लावील..
‘फ्रिक आऊट’ होताय, पण या गोष्टींकडेही लक्ष द्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 5:10 PM
प्रवासाला जाण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या काही टिप्स.
ठळक मुद्देप्रवासाला जाण्यापूर्वी त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावाधाव वाचेल आणि प्रवासाचाही आनंद घेता येईल.घराबाहेर पडताना कमीत कमी सामान आपल्याबरोबर ठेवायला हवं. अत्यावश्यक गोष्टी मात्र सोबत हव्यातच.जिथे आपण जाणार असू, तिथे शक्यतो दिवसाउजेडीच पोहोचण्याचा प्रयत्न करा.