माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हा शिखर आतापर्यंत अनेकांना सर केलाय. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असाही पर्वत आहे, जो सर्वात उंच नसला तरी आजपर्यंत कुणीही सर करू शकलं नाही. हा पर्वत आपला शेजारी देश भूतान आणि चीनच्या मधोमध आहे. या पर्वताचं नाव आहे Gangkhar Puensum (White Peak Of The Three Spiritual Brothers). या पर्वताची उंची 24,836 फूट आहे. तर माउंट एव्हरेस्टची उंची 29,029 फूट आहे.
आहे की नाही अजब प्रकरण. जगातल्या सर्वात उंच पर्वताहून केवळ ३ हजार फूट लहान असलेला हा डोंगर अजून कुणीच सर करू शकल नाहीय. याला कारण आहे भूतान आणि येथील काही कायदे.
Source: bhutanyodsel.com
भूतानमध्ये लोक पर्वतांना देवा समान दर्जा देतात. हे त्यांच्या एका पवित्र स्थळासारखे असतात. १९९४ मध्ये भूतानने एक कायदा केला होता. त्यानुसार, ६ हजार फूटपर्यंतची उंची असणाऱ्या पर्वतांवर जाण्यास पर्यटकांनी अजिबात परवानगी नाही. या डोंगराची उंची साधारण ७ हजार मीटर आहे.
(Image Credit :LiveAbout)
त्यामुळेच इथे अजून पर्यटक किंवा गिर्यारोहक पोहोचू शकलेले नाहीत. ज्याप्रकारे माउंट एव्हरेस्टला गिर्यारोहक घाणेरडं करत आहेत. ते पाहून भूतानने हा नियम तयार केला होता. जो योग्यही वाटतो.
(Image Credit : Condé Nast Travele)
असं नाही की, या पर्वातावर चढण्याचा प्रयत्न केला गेला नाही. १९९८ मध्ये जपानच्या काही गिर्यारोहकांनी चीनकडून या पर्वातावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. भूतान जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वेळीच कारवाई करत चीन सरकारला यावर चढाई करणे रोखण्यासाठी आग्रह केला होता.
(Image Credit : Reddit)
चीन सरकारने भूतानची विनंती मान देत गिर्यारोहकांचं परमिट कॅन्सल केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत या पर्वतावर कुणीही जाऊ शकलं नाही. त्यामुळे याला तुम्ही जगातला सर्वात उंच असा पर्वत म्हणू शकता, जो कुणीही सर करु शकलं नाही.