इथे आहे भारतातील पहिलं डायनासोर म्युझिअम आणि फॉसिल पार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:09 PM2019-06-18T13:09:31+5:302019-06-18T13:12:57+5:30
आतापर्यंत आपण डायनासोर फक्च हॉलिवूडपटांमध्ये पाहिले आहेत. जुरासिक पार्क या डायनासोर्सचं आयुष्य दाखवणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेमधून डायनासोर कसे दिसायचे? त्यांचे वेगवेगळे प्रकार, ते कसे राहायचे यांसारख्या अनेक गोष्टी आपल्यासमोर या विदेशी चित्रपटांमधून मांडण्यात आल्या.
आतापर्यंत आपण डायनासोर फक्च हॉलिवूडपटांमध्ये पाहिले आहेत. जुरासिक पार्क या डायनासोर्सचं आयुष्य दाखवणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेमधून डायनासोर कसे दिसायचे? त्यांचे वेगवेगळे प्रकार, ते कसे राहायचे यांसारख्या अनेक गोष्टी आपल्यासमोर या विदेशी चित्रपटांमधून मांडण्यात आल्या. पण आता आपल्याला आपल्या देशातच डायनासोर पाहायला मिळणार आहेत. थबकलात ना? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, अनेक वर्षांपूर्वी नष्ट झालेला हा प्राणी पुन्हा जन्म घेणार की काय? घाबरू नका.... असं काहीही होणार नसून तुम्हाला डायनासोर पाहता मात्र नक्की येणार आहेत. म्हणजेच, भारतामध्ये पहिलं डायनासोर म्युजिअम तयार करण्यात येणार आहे.
(Image Credit : TripAdvisor)
गुजरातमध्ये भारतातील पहिलं डायनासोर म्युझिअम आणि फॉसिल पार्क तयार करण्यात येणार आहे. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील रायोली गावामध्ये हे उभारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी म्युझिअमचं उद्घाटन केलं असून आता पर्यटकांसाठीही हे म्युझिअम खुलं करण्यात आलं आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रयोली गाव जगातील दुसरं सर्वात मोठ्या डायनासोर हॅचरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जवळपास 10 हजार डायनासोरची अंडी सापडली होती. तसेच हे गाव जगातील तिसरं सर्वात मोठं फॉसिल साइट म्हणूनही प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की, हे ठिकाण आणि याच्या आजूबाजूची इतर ठिकाणं या विशाल प्राण्याचं निवासस्थान होतं.
या म्युझिअममध्ये डायनासोर्सच्या जवळपास 50 प्रतिमा आहेत. यातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, म्युझिअममध्ये 3डी प्रोजेक्शनदेखील असणार आहेत, जे 360 डिग्री वर्च्युअल रिअॅलिटी प्रेजेंटेशन, गेमिंग कंसोल, इंटरॅक्टिव कियोस्क आणि इतर अनेक सुविधा देणार आहे. याव्यतिरिक्त इतिहासाची आवड असणाऱ्यांना एक्सप्लोर करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.