कोरोनाच्या महासाथीमुळे जगभरातील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. भारताबाबत सांगायचं झालं तर विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल अथवा ईटीए म्हणजेच ई-ट्रॅव्हल अथॉरिटीच्या सुविधेसह ५३ देशांत प्रवेश करता येणार आहे. या ५३ देशांच्या यादीत नेपाळ, भूटानसह १६ देशांमध्ये भारतीयांना व्हिसाची गरज पडणार नाही. तर ईराण, म्यानमारसह ३४ देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा किंवा ई व्हिसाची सुविधा वापरता येईल.
याशिवाय श्रीलंकेसहित ३ देशांमध्ये प्रवासासाठी ईटीए सुविधा उपलब्ध आहे. ईटीए म्हणजे व्हिसा नाही. परंतु या ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी त्या ठिकाणच्या प्रशासनाची मंजुरी घेणं आवश्यक असतं. तर भारतीयांना १४५ देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज भासेल. तर सध्या काही देशांमध्ये कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे.
या १६ देशांत व्हिसाची गरज नाही
- बाराबडोस (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- भूटान (१४ दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- डॉमिनिका (१८० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- एल साल्वाडोर (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- झांबिया (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- ग्रॅनाडा (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- हैती (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- नेपाल (विना व्हिसा प्रवास)
- फिलीस्तीन टेरीटरीज (विना व्हिसा प्रवास
- सेंट किट्स अँड नेविस (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- सेनेगल (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- सर्बिया (३० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- सेंट विन्ंसेट अँड द ग्रेनाडिन्स (३० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- त्रिनिदाद अँड टोबॅगो (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- ट्युनिशिया (९० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
- वालूआतू (३० दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास)
३४ देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल
अर्मेनिया, बोलविया, केप वेर्डे, कोमोरोस, झिबौती , इथियोपिया, गाबोन, गिनीया, गिनीया बिस्साऊ, ईराण, केनया, लेसोथो, मादागास्कर, मालवी, मालदिव, मॉरिटेनिया, म्यानमार, नायजेरिया, पलाऊ, रशियन फेडरेशन, रवांडा, सेंट ल्युसिया, सामोआ, सेशेल्स, सिएरा लियोन, सोमालिया, दक्षिण सूडान, सुरीनाम, टांझानिया, टोगो, तुवालू, यूगांडा, उझबेकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई व्हिसा या सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. या शिवाय आइवरी कोस्ट (प्री-एनरॉलमेंट), जमैका आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये ईटीए या सुविधेचा लाभ भारतीयांना घेता येऊ शकतो.
(सोर्स - पासपोर्ट इंडेक्स)