दररोजचं टेन्शन विसरा आणि 'या' 5 ठिकाणांना भेट देऊन रिलॅक्स व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:12 PM2019-05-13T16:12:22+5:302019-05-13T16:13:00+5:30
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक गोष्टीत विविधता आढळून येते. अशातच समर व्हेकेशनसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करणं फार चॅलेंजिंग काम आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक गोष्टीत विविधता आढळून येते. अशातच समर व्हेकेशनसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करणं फार चॅलेंजिंग काम आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. अशातच मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून तुम्हीही या सुट्यांमध्ये फिरण्यासाठी काही खास प्लॅक करत असाल. उन्हाळ्यात फिरायला जाताना प्रत्येकाचीच इच्छा असते की, अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उकाड्यापसून शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी जावं. तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही बेस्ट डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या सुट्यांमध्य फिरण्यासाठी भारतातील काही बेस्ट डेस्टिनेशन्सबाबत...
चिटकुल (Chitkul)
कमी बजेटमध्ये बेस्ट जागा शोधण्यासाठी चिटकुल एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये असलेल्या या हिल स्टेशनवर फिरण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणं आहेत. येथे तुम्ही लियुग मंदिर, अल्पाइनची घनदाट जंगलं, बस्पा नदी यांसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त वाइल्ड लाइफ फोटोग्राफीसाठीही हे डेस्टिनेशन बेस्ट आहे.
खिर्सू (Khirsu)
उन्हाळ्यामध्ये त्रासदायक उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही उत्तराखंडमधील खिर्सू येथे जाऊ शकता. जास्त प्रसिद्ध नसलं तरिही हे अत्यंत शांत आणि मन प्रसन्न करणारं ठिकाम आहे. येथील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं.
कलिम्पोग (Kalimpong)
जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये थंड आणि अल्हाददायी वातावरणामध्ये फिरण्याचा आनंद घेण्याची इच्छा असेल तर पश्चिम बंगालच्या कलिम्पोग या छोट्याशा गावाला नक्की भेट द्या. येथील हिरवी शाल पांघरलेले रस्ते, चहाचे मळे, कॅथलिक चर्च, मॉनेस्ट्री आणि नदींचे संगम तुमचं मन प्रसन्न करतील.
मसिनागुडी (Masinagudi)
निसर्ग आणि प्राणीप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षाही सुंदर आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. येथे तुम्हाला पक्षी आणि प्राण्याच्या अनेक जाती पाहायला मिळतील. तसेच जंगली हत्ती, वाघ, सांबर, हरणं आणि सापांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त येथील नाइट लाइफ अत्यंत प्रसिद्ध आहे.
हाफलोंग (Haflong)
वाइट अॅन्ड हिलॉकच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या हिल स्टेशनमध्ये तुम्ही लॅन्डस्केप, तलाव आणि सुंदर डोंगरांची दृश्य पाहू शकता. पर्यटकांसाठी येथे ट्रॅकिंग आणि पॅरागलायडिंगची स्पेशल व्यवस्था करण्यात आलेली असते.