उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी फिरायचा जाण्याचा प्लॅन करतात. पण कुठे जायचं हा प्रश्न पडला असेल तर चिंता करु नका. कारण आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादीच घेऊन आलो आहेत. जर तुम्हाला उन्हाळ्याच्या उकाड्यातून सुटका हवी असेल आणि हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात सुट्टी एन्जॉय करायची असेल तर खालील काही ठिकाणे तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरु शकतात.
1) नागरहोल नॅशनल पार्क
हत्तीची सवारी करणं हे लहान मुलांना फारच आवडीचं असू शकतं. मोठ्यांनाही हत्तीच्या पाठीवर बसून सैर करायची आवड असते. पण हे शहरात सहजासहजी शक्य होत नाही. पण नागरहोल नॅशनल पार्कमध्ये तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कर्नाटकातील हे नागरहोल नॅशनल पार्क जगभरात आपल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे हत्तीचे मोठे कळप अगदी सहज बघायला मिळतात. हत्तीवर बसून तुम्ही जंगलाची सफारीही करु शकता.
2. बांधवगढ नॅशनल पार्क
मध्यप्रदेशातील बांधवगढ नॅशनल पार्कमध्ये वाईल्ड लाईफ तुम्ही एन्जॉय करु शकता. इथे ओपन जीपमध्ये बसून तुम्ही दाट जंगलाची सफारी करु शकता. वेगवेगळ्या प्राण्यांना जवळून पाहू शकता. इतकेच नाहीतर येथील तलावांमध्ये तुम्ही हत्तीच्या पाठीवर बसून पाण्यात भिजण्याची मजाही घेऊ शकता.
3. कान्हा नेशनल पार्क
मध्यप्रदेशमधीलच कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघ, दुर्मिळ जातींचे प्राणी-पक्षी आणि जंगली हत्तींना बघण्याचा आनंद घेऊ शकता. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. इथेही हत्तीची सफारी केली जाऊ शकते.
4. मानस नॅशनल पार्क
मानस नॅशनल पार्क हा आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे. हा नॅशनल पार्कला नॅशनल हेरिटेज म्हणूनही दर्जा देण्यात आला आहे. येथील दुर्मिळ जातींच्या प्राण्यांना बघण्यासाठी दुरून लोक येतात.
5. राजस्थान
हत्तींची रॉयल सफारी करण्यासाठी राजस्थानला जायला हवं. इथे रंगी-बेरंगी हत्तींवर बसून तुम्ही वाळवंटाची सफर करु शकता. राजस्थानमध्ये हत्तींवर बसून तुम्ही अनेक किल्ल्यांची सफर करु शकता.