आयआरसीटीसी नेहमीच पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आणि मुख्यतः खिशाला परवडणाऱ्या टूर ऑफर्स घेऊन येत असते. आताही IRCTC ने पर्यटकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. पण यावेळी देशातील नव्हे तर देशाबाहेरील ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी आयआरसीटी उपलब्ध करून देत आहे. IRCTC टूरिज्मच्या विविध पॅकेजपैकी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि इस्त्राइल व्यतिरिक्त आता साऊथ ईस्ट आशिया फिरण्याची संधी देत आहे. जर तुम्हीही व्हिएतनाम आणि कंबोडियासारख्या ठिकाणांना भेट देण्याच्या विचारात असाल तर IRCTCच्या स्पेशल टूर पॅकेजबाबत नक्की जाणून घ्या.
3 देशांमध्ये फिरण्याची सुवर्णसंधी
IRCTCच्या या टूरचं नाव हेरिटेज साउथ ईस्ट आशिया एक्स चेन्नई असं आहे. ज्यामध्ये तुम्हाला कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओस या ठिकाणांना भेटण्याची संधी मिळणार आहे. या ट्रिपची सुरुवात चेन्नईपासून होणार असून ही ट्रिप 13 फेब्रुवारी 2019पासून सुरू होणार आहे. 8 दिवस आणि 7 रात्रींच्या या टूर पॅकेजमध्ये सिंगापूर एयरलाइन्सने येण्या-जाण्याचं तिकीट, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजेच तीन वेळच्या जेवणाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एक रात्र क्रूजवर राहणं आणि साइटसीइंगचाही खर्च समाविष्ट आहे.
1 लाख 30 हजार रूपयांमध्ये 8 दिवस फिरण्याची संधी
टूर पॅकेजच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या तीन मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत जाण्याचा विचार करत असाल तर ट्रिपल ऑक्यूपेंसीमध्ये प्रति व्यक्ती 1 लाख 29 हजार 500 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच डबल ऑक्यूपेंसी म्हणजेच जर 2 जणं टूर प्लॅन करत असाल तर प्रति व्यक्ति खर्च 1 लाख 30 हजार रूपये आणि सिंगल ऑक्यूपेंसीवर 1 लाख 43 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.
साउथ ईस्ट आशियाच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कंबोडियामध्ये असलेल्या रिसॉर्ट टाउन सियाम रीप (Siem Reap) मध्ये दोन रात्रींसाठी राहण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर लाओसची राजधानी लुआंग प्रबांगमध्ये 2 रात्रींसाठी राहण्याची संधी मिळणार आहे. एवढचं नाही तर एका रात्री साठी हॅलॉन्ग बे क्रूजवर आणि 2 रात्री व्हिएतनामची राजधानी हनोई सिटीमध्ये राहायला मिळणार आहे.