कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:44 PM2018-04-25T12:44:35+5:302018-04-25T12:44:35+5:30

कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे.

Know about city of love in Guhawati | कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन

कपल्ससाठी हे शहर ठरु शकतं परफेक्ट डेस्टिनेशन

Next

कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे. आसाममधील तेजपूर शहर हे आसाममधील 'प्रेमाचं शहर' म्हणून आणि राहण्यासाठी सर्वात उपयुक्त शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया या शहराची खासियत काय आहे.

सिटी ऑफ रोमान्स 

गुवाहाटीपासून जवळपास 180 किमी दूर तेजपूर हे शहर आहे. विशाल ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावर वसलेल्या या शहराला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं. तेजपूर शहर हे कपल्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशन मानलं जातं. इथे फिरण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तसेच तेजपूर या शहरापासून पुढे अरुणाचल प्रदेशची सुरुवात होते. तेजपूर या शहराला सिटी ऑफ रोमान्स असंही म्हटलं. 

पदुम पुखरी तलाव

पदुम पुखरी नावाचा प्रसिद्ध आणि सुंदर तलाव इथे आहे. पदुमचा अर्थ कमळ आणि पुखरीचा अर्थ तलाव असा होतो. तसेच या शहरातील आणखी एक बोर पुखरी म्हणजेच तलाव प्रसिद्ध आहे. इथे आल्यावर तुम्ही टॉय ट्रेन आणि पॅडलिंगचाही आनंद घेऊ शकता. या तलावात एक म्युझिकल फाऊंटेनही आहे. 

लीची फळासाठी प्रसिद्ध

असं सांगतात की, इथे आल्यावर लीची हे फळ आवर्जून खायला हवं. आपल्या वेगळ्या आकारासाठी, गर्द रंगासाठी आणि गोडव्यासाठी लीची प्रसिद्ध आहे. भारतासह लीचीला परदेशातही मोठी मागणी आहे. 

अरुणाचल प्रदेशासाठी ट्रान्झिट पॉईंट

तवांग, सेला पास, बोमडीला आणि झिरो व्हॅली यांसारख्या अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध शहरांमध्ये जाण्यासाठी तेजपूरहूनच जावं लागतं. त्यामुळे या ठिकाणांवर जाणारे पर्यटक हे तेजपूरला थांबणं पसंत करतात. 

नामेरी नॅशनल पार्क

(Image Credit : travelsindiamart.com)

तेजपूरपासून जवळपास 35 किमी अंतरावर नामेरी नॅशनल पार्क आहे. 200 वर्ग किमीमध्ये पसरलेल्या या नॅशनल पार्कमध्ये रॉयल बंगाल टायगरही बघायला मिळतात. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणे पसंत असेल तर इथे अनेक रिसॉर्टही आहेत. इतकेच काय तर येथील तलावात तुम्ही मासे पकडण्याचाही अनुभव घेऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती आणि विविध प्रजातींचे पक्षी-प्राणीही तुम्हाला बघायला मिळतात. 

Web Title: Know about city of love in Guhawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.