दीपिका-रणवीरचं वेडिंग डेस्टिनेशन माहीत आहे का? जाणून घ्या वैशिष्ट्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 12:31 PM2018-10-20T12:31:37+5:302018-10-20T12:36:05+5:30
बॉलिवुडचे चार्मिंग कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 10 नोव्हेंबरला हे दोघेही आपली लग्नगाठ बांधू शकतात.
बॉलिवुडचे चार्मिंग कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 10 नोव्हेंबरला हे दोघेही आपली लग्नगाठ बांधू शकतात. असं देखील सांगण्यात येत आह की, या बॉलिवूड कपलने आपल्या लग्नासाठी इटलीमधील कोमो लेकला आपलं वेडिंग डेस्टिनेशन म्हणून सिलेक्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी ईशा अंबानी आणि आनंद अंबानी यांचा साखरपुड्याचा समारंभ पार पडला होता. जगभरामध्ये आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोमो लेकबाबत जाणून घेऊया...
View this post on Instagram
इटलीमधील तिसरा सर्वात मोठा तलाव
इटलीमधील लेक कोमो आतापर्यंत अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींचं फेवरेट डेस्टिनेशन राहिलं आहे. या ठिकाणी अनेक जोडप्यांनी आपली लग्नगाठ बांधली असून लेक कोमो हा इटलीतील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. एलेप्सच्या डोगंरावर असलेला हा तलाव अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो.
View this post on Instagram
यूरोपमधील सर्वाधिक खोली असलेला तलाव
लेक कोमो यूरोपमधील सर्वाधिक खोल असणाऱ्या तलावांपैकी एक आहे. या तलावाची खोली 1300 फूट आहे आणि जी 146 स्क्वेअर किलोमीटर पसरलेली आहे. चारही बाजूंना हिरवळ आणि बर्फाची शाल पांघरल्यासारखे सुंदर डोंगर तुम्हाला प्रसन्न करतील.
पूर्ण वर्षभरात कधीही करू शकता लग्न
जेवढी सुंदर ही जागा आहे तेवढंच सुंदर या ठिकाणचं वातावरण आहे. लेक कोमोच्या ठिकाणावरील वातावरण असं आहे की, तुम्ही या ठिकाणी वर्षभरात कधीही लग्न करू शकता. या ठिकाणी एकूण 15 वेडिंग प्लॅनर आहेत जे तुमचा लग्न यादगार करण्यासाठी तुमची मदत करतील. त्याचसोबत येथे 52 प्रकारचे व्हिलादेखील आहेत जिथे तुम्ही स्वतः राहू शकता आणि तुमच्या पाहुण्यांची देखील सोय करू शकता.
View this post on Instagram
वेडिंग डेस्टिनेशनसोबतच इतरही गोष्टी आहेत
काही लोकांना असं वाटतं की, लेक कोमो फक्त लग्न आणि इतर समारंभांसाठीच नाही तर पर्यटनासाठीही ओळखलं जातात. तुम्ह तुमचं हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही या डेस्टिनेशनला जाऊ शकता. अनेक हॉलिवूड चित्रपटांची शूटिंगदेखील येथे झाली आहे. येथील गावं अजूनही मध्यकालीन वास्तू आणि परंपरा जपताना दिसतात. त्याचप्रमाणे येथे एक प्राचीन किल्ला देखील आढळतो.