आश्चर्यच, दिवसातून तीन वेळा रंग बदलते हे शिवलिंग; एकदा तरी दर्शन नक्की घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 06:43 PM2019-06-16T18:43:00+5:302019-06-16T18:43:41+5:30
भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांची स्थापना किंवा मंदिरात स्थापन केलेल्या मूर्ती यांबात अनेक आश्चर्य व्यक्त करणाऱ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत माहीत झाल्यानंतर तुम्ही खरंच अवाक् व्हाल.
भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांची स्थापना किंवा मंदिरात स्थापन केलेल्या मूर्ती यांबात अनेक आश्चर्य व्यक्त करणाऱ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत माहीत झाल्यानंतर तुम्ही खरंच अवाक् व्हाल. जर तुम्ही धार्मिक ट्रिपवर जाण्याचा विचार करत असाल तर राजस्थानमधील 'अचलेश्वर महादेव'च्या दर्शनासाठी नक्की जा. या मंदिरामध्ये असलेलं शिवलिंग आपलं रंग बदलतं. त्यामुळे फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक लोकं याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
तीन रंगाचं दिसतं हे शिवलिंग
राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यामध्ये असलेलं 'अचलेश्वर महादेव' मंदिराबाबत अनेक तज्ज्ञ सांगतात की, शिवलिंग दिवसातून तीनवेळा रंग बदलतं. सकाळच्या वेळी हे शिवलिंग लाल रंगाचं दिसतं. तेच दुपारच्या वेळी केशरी रंगाचं आणि रात्री काळ्या रंगाचं दिसतं.
शिवलिंगाचा ठावचं मिळेना
स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, शिवलिंगाच्या रंग बदलण्याच्या गोष्टीमागील कारण शोधण्यासाठी अनेकदा मंदिराच्या आजूबाजूला खोदकाम करण्यात आलं. परंतु खोलवर खोदकाम करूनही शिवलिंगाचा ठाव काही सापडलाच नाही. शेवटी हैराण झालेल्या लोकांनी भगवान शंकराची कृपा समजून खोदकाम बंद केलं.
कोणीच समजू शकलं नाही रहस्य...
'अचलेश्वर महादेव' मंदिरातील शिवलिंगाच्या रंग बदलण्यामागील खरं कारण शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यासाठी पुरातत्व विभागानेही अनेक प्रयत्न केले परंतु त्यांनाही यश मिळालं नाही. परंतु जेव्हा काहीच हाती लागलं नाही त्यावेळी सर्वांनी प्रयत्न बंद करून हा दैवी चमत्कार असल्याचे मान्य केलं.