उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तुम्हीही कुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये जाणार असाल तर तुमचा प्रवास फक्त कुंभ मेळ्यापुरताच मर्यादीत ठेवू नका. प्रयागराजमध्ये इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्या ठिकाणांना भेट देवू शकता. जाणून घेऊयात तुम्हाला प्रयागराजमध्ये कोणती ठिकाणं पाहायला मिळतील.
- यावर्षी कुंभ मेळ्याचे आयोजन उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयागराज सज्ज झालं असून संपूर्ण सहर सजवण्यात आलं आहे. 'पेंट माय सिटी' या कॅम्पेन अंतर्गत सर्व महत्त्वपूर्ण चौक आणि इमारती रंगवण्यात आल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रयागराजमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्हाला भारतीय कला आणि संस्कृती जवळून अनुभवण्यास मदत होईल.
- अखाड्यांमध्ये जिथे नागा साधूंची दिनचर्या आणि वेगवेगळ्या मुद्रा अनुभवता येतात. तिथेच अरैल मेला क्षेत्रामध्ये तयार करण्यात आलेल्या संस्कृती आणि कला ग्राममध्ये भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
- कला ग्रामजवळ उत्तर मध्य क्षेत्रामध्ये सांस्कृतिक केंद्राचं मंडप आहे. येथे देशातील सात सांस्कृतिक केंद्रांबाबत माहीती दिली जाणार आहे.
- कुंभ मेळ्यामध्ये येणारी लोकं पहिल्यांदा अकबरच्या किल्यामध्ये अक्षयवट आणि सरस्वती कूपचे दर्शनही करू शकतील. याव्यतिरिक्त 12 माधवांची परिक्रमा आणि क्रूझची सफरही करता येणार आहे.
- अरैल मेळा क्षेत्र आणि मुख्य मेळ्याच्या क्षेत्रामध्ये अनेक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. जिथे लोकं कुंभ मेळ्यातील आठवणीं कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकतील.
- पर्यटन विभागाने लोकांसाठी हेलिकॉप्टर राइडची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त लेजर शोचाही आनंद घेता येणार आहे.
पाहता येईल समुद्र मंथन :
3डी प्रोजेक्शन द्वारे यावेळी श्रद्धाळू कुंभ मेळ्यामध्ये समुद्र मंथनाची दृश्य पाहू शकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मोठ्या इमारतींवर होणाऱ्या 3डी प्रोजेक्शन मॅपिंगची दृश्य यावेळी कुंभ मेळ्यामध्ये पाहता येणार आहेत. अहमदाबादची कंपनी ब्लिंक 360ने याची तयारी केली आहे. याद्वारे उपयोग हॉलमध्ये लोकांना समुद्र मंथन आणि रामायणाचे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. कंपनीचे एमडी लोवालेन रोजापियो यांनी सांगितल्यानुसार, एनिमेटेड फिल्मसाठी वृंदावनातील प्रेम मंदिराचा सेट तयार करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, एका तासामध्ये दोन शो दाखवण्यात येतील आणि प्रत्येक शो 7 मिनिटांचा असेल. दोन्ही शो हिंदीमध्ये असून ते पाहण्यासाठी 3डी चश्मा लावण्याचीही गरज भासणार नाही. हा शो पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रूपये मोजावे लागणार असून एका वेळी 400 लोकं हा शो पाहू शकणार आहेत.
कुंभ मेळ्याबाबत थोडक्यात :
कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते.