लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल आता हाती आले आहेत. गेल्या कित्येक दिवासांपासून २३ मे या दिवसाची वाट अनेकजण पाहत होते. अनेकजण यादरम्यान धावपळ करून चांगलेच थकले असतील. काही पक्षाचं काम करून थकले असतील तर काही लोक सगळी धावपळ, चर्चा पाहून थकले असतील. गेल्या तीन दिवसांपासून सतत टीव्ही, न्यूज पेपर आणि सोशल मीडियात तेच तेच पाहून-वाचून अनेकांना कंटाळा आला असेल. हा कंटाळा घालवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकामांची यादी घेऊन आलो आहोत.
१) पशुपतीनाथ
(Image Credit : Nepal Tourism Board)
पशुपतीनाथ हे मंदिर काठमांडूपासून जवळपास ६ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. इथे भगवान महादेवाची सुंदर मूर्ती आहे. भगवान महादेवाचं हे मंदिर बागमती नदीच्या तटावर आहे. आणि आजूबाजूला हिरवीगार झाडं. रिलॅक्स होण्यासाठी आणि स्ट्रेस घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.
२) लेपाक्क्षी
(Image Credit : nativeplanet.com)
लेपाक्क्षी बंगळुरूपासून साधारण १२० किमी अंतरावर आहे. हे ठिकाणा फार मोठं नाहीये, पण इथे बघण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळे आहेत. इथे तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
३) हार्सिली हिल्स
हार्सिली हिल्स हे ठिकाण आंध्र प्रदेशात आहे. येथील डोळ्यांचं पारणं फेडणारं अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य काही क्षणातच तुमचा थकवा, स्ट्रेस दूर करेल.
४) मुक्तेश्वर
मुक्तेश्वर हे उत्तराखंडमधील असं ठिकाण आहे जे सुंदर असण्यासोबतच फार स्वच्छ देखील आहे. जर तुम्हाला ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बायकिंग आणि राफ्टिंगची आवड असेल तर तुम्ही इथे आवर्जून भेट द्यावी.
५) चेरापूंजी
मे आणि जून महिन्यात होणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवायची असेल तर चेरापूंजी चांगला पर्याय आहे. चेरापूंजीतील हिरवळ, शांतता आणि खळखळून वाहणारे झरे तुम्हाला आनंद देऊन जातील.
६) मजूली
(Image Credit : The Hindu)
आसाममधील हे ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साइट आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच मजूली साहित्य, कला आणि संगीताचा संगम आहे. जर काही वेगळं बघण्याची आणि रिलॅक्स होण्याची आवड असेल तर इथे देऊ शकता भेट.
७) खजिहार
(Image Credit : nativeplanet.com)
खजिहारला भारतातील मिनी स्वित्झर्लॅंड म्हटलं जातं. कारण येथील हिरवीगार झाडं आणि उंचच उंच डोंगर तुमच्या मनात घर करतील.