भारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:03 PM2019-01-23T16:03:58+5:302019-01-23T16:04:33+5:30

जर तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर भारतातीलच रहस्यमय आणि अॅडव्हेचर्स ठिकाणाची तुम्ही निवड करू शकता. देशामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याबाबत अनेकांना फारसं माहीत नाही.

Must visit these top secret indian destinations | भारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का?

भारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का?

Next

जर तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर भारतातीलच रहस्यमय आणि अॅडव्हेचर्स ठिकाणाची तुम्ही निवड करू शकता. देशामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याबाबत अनेकांना फारसं माहीत नाही. ज्यांचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आहे. तुम्हीही अशाच आगळ्या वेगळ्या ठिकाणांना भेट देण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत. जी ठिकाणं टॉप सिक्रेट डेस्टिनेशन्स असून अडवेंचर्स आणि निसर्गसौंदर्यासाठी उत्तम ठरतील. 

बिशनुपूर - वेस्ट बंगाल (Bishnupur, West Bengal)

बंगाल म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं कोलकत्ता शहर, परंतू एकदा तुम्ही बिशनुपूरला भेट द्याल तर कोलकत्ताचा विसर पडेल. हे ठिकाण बंगालच्या वेगळ्या संस्कृतीसोबत इतिहासाचं दर्शन घडवते. हे ठिकाण लोकसंगीत, पीतळ की आणि टेराकोटाच्या सुंदर कलाकृतीं आणि मंदिरांसाठी ओळखलं जातं. येथे रासमंच पिरामिडच्या रूपामध्ये विटांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं सर्वात जुनं मंदिर आहे. हे मंदिर 16 व्या शतकामध्ये राजा वीर हंबीर यांनी बांधलं होतं. त्यावेळी रास उत्सवादरम्यान संपूर्ण शहरातील मूर्ती याच मंदिरामध्ये आणून ठेवल्या जात असत. हा उत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यंटक येथे येत असत. याशिवाय येथे अनेक मंदिरं आहेत. त्यामुळे कोणी बिशनुपूरला मंदिरांचं शहर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


 
मकक्लुस्कीगंज - झारखंड (McCluskieganj, Jharkhand )

झारखंडमध्ये असलेलं मकक्लुस्कीगंज एके काळी 400 अ‍ॅग्लो-इंडियन कुटुंबियांचं घर होतं. ही जागा आजही इतिहासाची ग्वाही देत असते. येथे फिरण्यासाठी येणारे पर्यंटकांना एक वेगळा अनुभव मिळतो. येथील निसर्गसौंदर्याची दखल घेतल्यानंतरच कोंकणा सेन शर्माने 'डेथ इन द गंज' या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. ही जागा स्थानिक लोकं आणि पश्चिम बंगालमधील लोकांमध्ये रोमॅन्टिक डेस्टिनेशन म्हणून ओळखली जात असे. 

लतापंचर - दार्जिलिंग (Latpanchar, Darjeeling)

दार्जिलिंगमध्ये असलेलं हे ठिकाणं आपल्या निसर्गसौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतं. येथे तुम्ही दार्जिलिंगमधील अनेक अनोख्या गोष्टी पाहू शकता. लतापंचर या दार्जिलिंगमधील छोट्याश्या गावामध्ये तुम्हाला अनेक निसर्गरम्य ठिकाणं पाहता येतील. जर तुम्हाला पक्षीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे ठिकाण उत्तम ठरेल. हे ठिकाण बर्ड वॉचिगसाठी प्रसिद्ध आहे. लतापंचर न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनपासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. 

माणा - उत्तराखंड (Mana, Uttarakhand)

उत्तराखंडातील या गावाला भारतातील शेवटचं गाव म्हटलं जातं. 'माणा' हे ठिकाण आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त अध्यात्मासाठी ही जागा अत्यंत सुंदर आहे. कारण येथे गणेश गुहा, व्यास गुहा, वसुधारा, भीमपुल आणि सरस्वती मंदिर आहे. येथील लोकांची मान्यता आहे की, श्री व्यासमुनींनी या ठिकाणीच पौराणिक ग्रंथांच्या रचना केल्या होत्या. तसेच वसुधाराबाबत सांगायचे झाले तर, येथे असलेला झरा एवढा उंच आहे की, एकाचवेळी पूर्ण पाहणंही शक्य नाही. तसेच ज्यावेळी झऱ्याचं पाणी वरून खाली पडतं. त्यावेळी हे पाणी पाहून मोत्यांचा वर्षाव होत असल्याचा भास होत होता. 

Web Title: Must visit these top secret indian destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.