गोव्याला जाऊन या ठिकाणांवर चुकूनही घेऊ नका सेल्फी, पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 12:24 PM2018-06-29T12:24:30+5:302018-06-29T12:25:00+5:30

आता गोव्यात काही ठिकाणांवर सेल्फी काढणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. सेल्फीच्या नादात होणारे मृत्यू टाळण्यासाठी गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

Planning for Goa trip dont click a selfies at these points | गोव्याला जाऊन या ठिकाणांवर चुकूनही घेऊ नका सेल्फी, पडू शकतं महागात!

गोव्याला जाऊन या ठिकाणांवर चुकूनही घेऊ नका सेल्फी, पडू शकतं महागात!

Next

सध्या पावसामुळे सगळीकडेच रोमॅंटिक वातावरण आहे. त्यामुळे अनेकजण फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. अनेकजण पावसात गोव्याला जाण्याला पसंती देतात. अलिकडे सेल्फीचं चांगलंच फॅड वाढलं आहे. जागोजागी सेल्फीची संधी शोधली जाते. पण आता गोव्यात काही ठिकाणांवर सेल्फी काढणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. सेल्फीच्या नादात होणारे मृत्यू टाळण्यासाठी गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

या जागांवर नाही काढता येणार सेल्फी

जर तुम्ही गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. राज्य सरकारनुसार, बागा नदी, डोना पॉला जेटी, सिंकरीम किल्ला, अजुंना, मोरजिम, अश्र्वेम, आरमोबलसोबतच उत्तर गोव्यातील बमबोलिम आणि सिरिदोओ परिसराला नो सेल्फी झोन घोषित केले आहे. 

नो सेल्फीचे बोर्ड

सेल्फीच्या नादात होणाऱ्या घटना बघता दक्षिण गोव्यात अगोंडा, होलांत, जॅपनीज गार्डन, बेतुलसारख्या ठिकाणांनर सेल्फी न घेण्याचे बोर्ड लागले आहेत. काही दिवसांपूर्वी फिरायला गेलेले तीन मित्र सेल्फी घेत असताना त्यातील एक समुद्रात वाहून गेला. 

30 सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाण्यास बंदी

सेल्फीमुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या बघता गोवा सरकारने काही ठिकाणांवर सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. तर 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाण्यासही बंदी केली आहे. 

Web Title: Planning for Goa trip dont click a selfies at these points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.