मालदीवमध्ये आहे जगातील पहिला अंडरवॉटर व्हिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:34 PM2018-12-06T17:34:22+5:302018-12-06T17:37:02+5:30
मालदीवच्या रांगली टापू येथे स्थित असणाऱ्या कॉनराड रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या गर्भातील जीवन जवळून अनुभवता येणार आहे.
मालदीवच्या रांगली टापू येथे स्थित असणाऱ्या कॉनराड रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या गर्भातील जीवन जवळून अनुभवता येणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच या रिसॉर्टमध्ये जगभरातील पहिला अंडर-सी व्हिला ओपन करण्यात आला आहे. समुद्री जीवनाची गंमत अनुभवण्यासाठी आणि मालदीवच्या या हॉटेलमध्ये रात्री थांबण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात.
मालदीवचा पहिला अंडर वॉटर व्हिला
मालदीवमध्ये जगातील पहिला अंडरवॉटर व्हिला सुरू करण्यात आला आहे. पाणी आणि अंडरवॉटर अॅडव्हेंचर्स लव्हर्सनी या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावी.
पाण्यावरही आहे एक मजला
मालदीवच्या या रेस्टॉरंटचा एक मजला पाण्याच्या खाली तयार करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रातील जीवन अनुभवता येतं. तसेच या रेस्टॉरंटचा एक मजला पाण्याच्या वरती बांधण्यात आला आहे.
40 लाख रूपये लागतात
तुम्हालाही या हॉटेलमध्ये राहून समुद्रातील जीवन अनुभवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एका दिवसाचे 40 लाख रूपये मोजावे लागणार आहेत. धक्का बसला ना? तरिदेखील येथे अनेक पर्यंटकांची गर्दी पाहायला मिळते.
5 मीटर खोलपर्यंत आहे हॉटेल
हे रेस्टॉरंट दोन मजल्यांचं असून याचा पाण्याखाली तयार करण्यात आलेला मजला समुद्राच्या 5 मीटर खोलीपर्यंत तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त येथे एक बेडरूम, लिविंग रूम आणि बाथरूम देखील आहे.
जिमची देखील सुविधा
या अंडरवॉटर व्हिलाच्या पाण्याच्या वरती असलेल्या मजल्यावर जिमचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर किचनदेखील आहे. येथे एक डेकसुद्धा तयार करण्यात आला आहे. जेथून तुम्ही सनसेट अनुभवू शकता.