ट्रॅव्हलिंग दरम्यान अशी घ्या स्कीनची काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 10:38 AM2018-07-23T10:38:33+5:302018-07-23T10:43:01+5:30
ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते.
(Image creadit : AzerNews)
ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते. जर योग्य वेळी स्कीनची काळजी घेतली नाही तर, कालांतराने अनेक स्कीन प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात असे काही उपाय ज्यांमुळे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्येही तुमच्या स्कीनची काळजी घेऊ शकता.
1. स्किन स्वच्छ ठेवा
ट्रॅव्हल करण्यासाठी बाहेर जात असाल तर स्कीनची काळजी घेणं गरजेचं असतं. तसेच स्कीन साफ ठेवणंही गरजेचं असतं. सारखं फिरत राहिल्यानं स्कीन नीट स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे निदान तुमच्या चेहऱ्याच्या स्कीनची तरी काळजी घेणं गरजेचं असतं. चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स साफ करावेत. त्यामुळे चेहऱ्याला उजाळा मिळतो.
2. डोळ्यांना आराम द्या
चेहऱ्यावरील सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे. जर डोळे चमकदार असतील तर तुमचा चेहरा उजाळतो. त्यामुळे ट्रॅव्हलिंग दरम्यान त्यांना आराम देणं गरजेचं असतं. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक आय ड्रॉप स्वतः जवळ ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा लालसरपण आणि स्ट्रेस दूर होण्यास मदत होईल.
3. फेसवॉश आणि क्लिंजरचा वापर करा.
सततच्या प्रवासामुळे धुळ आणि वातावरणातील कण आपल्या चेहऱ्यावर जमा होते. ज्यामुळे चेहऱ्यावर काळवंडतो तसेच स्कीनही ड्राय होते. याव्यतीरिक्त तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्याही होऊ शकते. यापासून स्कीनला दूर ठेवण्यासाठी स्वतःसोबत एक क्लिंजर ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर करा. तसेच तोंड धुण्यासाठी तुमच्या स्कीन टाईपनुसार फेसवॉशचाही वापर करा.
4. हेल्दी आहार घ्या
ट्रॅव्हलिंग दरम्यान आपल्या आहराकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. फिरताना आपल्याकडे वेळ कमी असतो त्यामुळे बऱ्याचदा पोट भरण्यासाठी जंक फूडचा आधार घेतला जातो. यामुळे तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरही त्याचा परिणाम होईल. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करावा. यामुळे तुमच्या तब्येतीसोबतच तुमच्या चेहऱ्यासाठीही फायदेशीर ठरेल.
5. सन स्क्रीन क्रिमचा वापर करा.
कुठेही फिरायला जात असाल तर तुमच्यासोबत सन स्क्रीन क्रिम अवश्य ठेवा. थोड्याशा उन्हामुळेही तुमची स्कीन टॅन होऊ शकते. त्यामुळे कुठेही फिरायला जात असाल तर स्कीनसाठी सन स्क्रीन क्रिमचा वापर करा.