मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:24 PM2019-05-03T15:24:04+5:302019-05-03T15:25:13+5:30

मे महिन्याला सुरुवात झाली असून मुलांच्या शाळेच्या परिश्रा संपून त्यांना सुट्टीदेखील लागली आहे. अशातच तुम्हीही फॅमिली ट्रिपचा प्लॅन करत असाल.

These are the 5 best places to travel in the india | मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं

मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं

Next

मे महिन्याला सुरुवात झाली असून मुलांच्या शाळेच्या परिश्रा संपून त्यांना सुट्टीदेखील लागली आहे. अशातच तुम्हीही फॅमिली ट्रिपचा प्लॅन करत असाल. येथील उन्हाळ्याला कंटाळून थोड्याशा अल्हाददायी वातावरणात जाण्याच्या विचारात असाल तर आम्ही काही ठिकाणांबाबत सांगणार आहोत. तुम्ही नक्कीच विदेशातील ट्रिप प्लॅन केला असेल. पण तुम्हाला माहीत आहे. विदेशात जाण्याऐवजी आपल्या देशातच फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करू शकता. तसेच तुम्ही येथे तुमच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकता. जाणून घेऊयात देशातील काही खास ठिकाणांबाबत...

चिकमगलुर 

भारतातील कर्नाटकमध्ये असलेलं चिकमगलूर 'लँड ऑफ कॉफी'च्या नावानेही ओळखलं जातं. हे ठिकाण माउंटेन रेन्ज, नदी, हिल्स आणि हिरवळीची शाल पांघरलेलं आहे. नेचर लव्हर्स आणि इतर पर्यटकांसाठीही हे ठिकाण स्वर्गापेक्षआ कमी नाही. बाबा बुदान, गिरी, मुल्लायावगिरी आणि वॉटर फॉल्स येथे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतात. 

अलेप्पी

गॉड्स ओन कंट्री म्हणून ओलखलं जाणारं केरळ नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिलं आहे. त्यातल्यात्यात केरळमधील अलेप्पी हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. अलेप्पीला अलाप्पुझाच्या नावानेही ओळखलं जातं. तसेच अलेप्पीला पुर्वेकडील वेनिस म्हणून ओळखलं जातं. येथील पामच्या झाडांसोबत दूरवर पसरलेला समुद्र पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच येथील बॅकवॉटरमध्ये असलेल्या हाऊसबोट्समध्येही तुम्ही राहू शकता. 

अमृतसर 

अमृतसरला अम्बरसर असंही म्हटलं जातं. भारत-पाकिस्तान बॉर्डरवर असलेलं पंजाब हे शहर सुवर्ण मंदिर गुरुद्वारा श्री हरमदिर साहिब जी हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. हे शीख धर्माचं धार्मिक स्थळ आहे. तसेच येथील पदारर्थही प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. 

उटी 

तमिळनाडूमधील उटी नीलगिरीच्या डोंगररांगामध्ये वसलेलं आहे. उटी समुद्र सपाटीपासून जवळपास 7440 फूट (2268 मीटर) उंचावर स्थित आहे. उटीला 'हिल स्टेशन्सची राणी' असंही म्हटलं जातं. रोमॅन्टिक असण्यासोबतच प्राचीन समुद्र किनारे आणि वन्य जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. 

आग्रा

आग्रा म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर संगमरवरी भव्य असा ताजमहाल उभा राहतो. ताजमहाल पाहण्यासाठी दूरवरून अनेक लोक येत असतात. एवढचं नाही तर देशी पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकही येथे ताजमहालाचं सौंदर्य पाहण्यासाठी भेट देत असतं. याव्यतिरिक्त येथील खाद्यसंस्कृतीही अनुभवता येईल. 

Web Title: These are the 5 best places to travel in the india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.