तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:12 PM2019-05-06T18:12:51+5:302019-05-06T18:14:24+5:30

जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, ज्यांचं वर्गीकरण तुम्ही त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या स्वभावानुसार करू शकता. असेच काही लोक असतात ज्यांना प्राण्याची फार आवड असते.

These places will be glad to animal lovers | तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच

तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच

Next

जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, ज्यांचं वर्गीकरण तुम्ही त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या स्वभावानुसार करू शकता. असेच काही लोक असतात ज्यांना प्राण्याची फार आवड असते. प्राण्यांबाबत ते प्रचंड संवेदनशील असतात. त्यांना प्राण्यांबाबत जाणून घ्यायला खूप आवडतं. जर तुम्हीही अॅनिमल लव्हर्स असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया काही भन्नाट ठिकाणांबाबत...

जेलिफिश लेक 

जर तुम्ही आतापर्यंत जेलीफिश जवळून पाहिले नसतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी खरचं खूप खास ठरेल. कारण येथे तुम्ही जेलीफिश काचेतून नाही तर फार जवळून पाहू शकता. Palau's Rock Islands येथे असणाऱ्या या तलावामध्ये तुम्ही जेलीफिशसोबत पोहण्याचा आनंद घेऊ शकता. फार वर्षांपूर्वी येथे समुद्र होता, परंतु पाण्याची पातळी कमी असल्यामुळे येथे जेलीफिशची संख्या वाढत गेली. 

क्रॅब आयर्लंड

जर तुम्हाला खेकड्यांची भीती वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही अजिबातच जाऊ नका. कारण येथे ऑस्ट्रलियन आयर्लंडवर करोडोंच्या संख्येमध्ये खेकडे आहेत. जेव्हा यांचा ब्रीडिंग सीजन असतो. तेव्हा लाखोंच्या संख्येमध्ये हे पाण्यातून बाहेर येतात. मायग्रेशनच्या दरम्यान सरकार येथील सर्व रस्ते बंद करते. त्यामुळे खेकडे सुरक्षित आपला प्रवास करू शकतात. 

फॉक्स व्हिलेज, जपान

जपानच्या मियागीमध्ये एक असं गाव आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फॉक्स पाहायला मिळतील. येथे 6 प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रीडचे 100 पेक्षा जास्त कोल्हे आहेत. हे सर्व तेथील जंगलांमध्ये फिरत असतात. येथे येणारे विजिटर्स त्यांच्यासोबत खेळूही शकतात. पण त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतात. 

रॅबिट आयर्लंड 

रॅबिट आयर्लंड ओकोनोशिमाच्या नावानेही ओळखलं जातं. हा हिरोशिमाचा एक छोटासा भाग आहे. येथे ससे फार असून जवळपास ते शेकडोंच्या संख्येत आहेत. जेव्हा पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात, त्यावेळी हे सर्व ससे खाण्यासाठी त्यांच्या पाठीपाठी पळतात. हे कोणालाच माहिती नाही की, नक्की कधीपासून या जागेला रॅबिट आयर्लंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

कॅट आयर्लंड

जपानच्या सुदूरवर्ती द्विप ओशिमामध्ये एक वृद्ध व्यक्ती उंदरांच्या समस्येने हैराण झाला होता. त्यामुळे या उंदरांपासून बचाव करण्यासाठी त्याने मांजरींना या बेटावर आणलं होतं. त्यामुळे उंदरांची समस्या संपली परंतु आता मांजरींची संख्या वाढली असून ती 120 झाली आहे. खरं तर या बेटावर फक्त 20 वृद्ध माणसं राहत होती. पण आता येथील लोकांपेक्षा मांजरींची संख्या वाढत आहे. 

 

 

 

 

Web Title: These places will be glad to animal lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.