मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:00 PM2018-10-22T19:00:31+5:302018-10-22T19:01:13+5:30

देश-विदेशातील नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि भरपूर अॅडव्हेचर्स असलेल्या टूरिस्ट प्लेसवर फिरण्याची मजा काही औरचं.

top 5 adventurous and safe tourist place in india for single girls | मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं!

मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं!

Next

देश-विदेशातील नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची सर्वांचीच इच्छा असते. निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि भरपूर अॅडव्हेचर्स असलेल्या टूरिस्ट प्लेसवर फिरण्याची मजा काही औरचं. मुलांसाठी कोणत्याही ठिकाणी फिरण्यासाठी जाणं एवढं अवघड नसतं. परंतु मुलींसाठी एकट्याने फिरणं फार अवघड असतं. त्यांना अनेक गोष्टींची दखल घेऊन, विचारपूर्वक त्यांच्या टूरचा प्लॅन करावा लागतो. त्यातही अनेकदा घरातून परवानगी मिळणंही अवघड होतं. 

दरम्यानच्या काळात झालेल्या अनेक घटनांमुळे लोकांचा असा समज झाला आहे की, भारतामध्ये मुलींना एकट्याने फिरण्यासाठी कोणतंही सुरक्षित शहर नाही. परंतु असं नसून भारतामध्ये अनेक सुरक्षित अशी शहरं आहेत. जी मुलींना एकटं फिरण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. जाणून घेऊयात अशा काही डेस्टिनेशन्सबाबत...

1. वाराणसी

वाराणसी एक पवित्र धार्मिक शहरांपैकी एक आहे. काशी विश्वनाथांच्या या शहरामध्ये भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. वाराणसीमधील वेगवेगळ्या घाटांचं दर्शन घेण्यात एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हालाही फिरण्याची आवड असेल तर वाराणसीमध्ये तुम्ही एकटं फिरू शकता. 

2. आग्रा

जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य सर्वांनाच भूरळ घालतं. ताजमहालाव्यतिरिक्त अनेक इतरही स्थळ आग्र्यामध्ये स्थित आहेत, जी इतिहासाची ग्वाही देतात. तुम्ही एकट्याने फिरण्याचा विचार करत असाल तर आग्रा तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे.

3. चंबा

हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पर्यटक सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येत असतात. तुम्हाला एकटीला फिरण्यासाठी हिमाचलमधील चंबा शहर एक सुंदर डेस्टिनेशन आहे. येथे मंदिरांसोबत अनेक सुंदर जागा आहेत जिथे तुम्ही एकटं फिरण्याचा आनंद घेऊ शकता. 

4. चेन्नई

तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये अनेक ठिकाणं निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. तुम्ही एकटं फिरण्याच्या विचारात असाल तर चेन्नई तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं.
 
5. म्हैसूर

म्हैसूरमध्ये साजरा करण्यात येणारा दसरा संपूर्ण जरभरात नावाजलेला आहे. याव्यतिरिक्त म्हैसूरमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. एकटं फिरण्यासाठी म्हैसूर सुरक्षित ठिकाण आहे. 

Web Title: top 5 adventurous and safe tourist place in india for single girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन