(Image Credit: commons.wikimedia.org)
जर तुम्हाला बीचवर फिरायला जाण्याची आवड असेल तर तुम्ही असं लोकेशन निवडता जिथे तुम्हाला शांतता मिळेल. पण काही बीच असे असतात जिथे सतत गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला हवा असलेला आनंदही तुम्हाला मिळू शकत नाही. पण आम्ही तुम्हाला असा काही बीचची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्हाला तुमच्या मनासारखं एन्जॉय करता येऊ शकतं. हे बीच आहेत अंदमानमधील बीच...
राधानगर बीच
हॅवलॉकचा राधानगर बीच हा अंदमान-निकोबारमधील सर्वात चांगल्या बीचपैकी एक आहे. एका मॅगझिनच्या सर्व्हेनुसार, या बीचला जगातल्या ७ सर्वात चांगल्या बीचमध्ये स्थान दिलं आहे. इथल्या वाळूमध्ये सनसेटचा वेगळाच आनंद घेता येतो. राधानगर बीचवर न्सोर्कलिंग, स्वीमिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारखे गेम्सही पर्यटक खेळू शकतात.
एलीफेंट बीच
एलीफेंच बीच सुद्धा अंदमानमधील सुंदर बीचपैकी एक आहे. हॅवलॉक येथून या बीचवर जाण्यासाठी जहाजाने ३० मिनिटांचा वेळ लागतो. किंवा तुम्हा जंगलाच्या मार्गाने जाऊ शकता. या समुद्राचा शांत आणि निळा रंग मनाला वेगळीच शांतता देऊन जातो. या बीचवर तुम्ही वेगवेगळे समुद्री जीव सुद्धा बघू शकता.
विजयनगर बीच
हॅवलॉकमधील विजयनगर बीचही चांगलाच प्रसिद्ध आहे. इथे पाणी हवेत उडताना तुम्हाला बघायला मिळेल. स्वीमिंग, फोटोग्राफी आणि वॉटर सर्फिंगसाठी हा बीच परफेक्ट समजला जातो.
काळा दगड बीच
काळा दगड बीच हे नाव भलेही ऐकायला जरा विचित्र वाटत असेल पण हा बीच फार सुंदर आहे. हॅवलॉक आयलंडवर येणारे पर्यटक या बीचला आवर्जून भेट देतात.
वंडूर बीच
वंडूर बीचही अंदमान निकोबारमधील एक लोकप्रिय बीच आहे. हा बीच महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्कच्या प्रवेशव्दारावर स्थित आहे. यात मोठ्या प्रमाणात समुद्री जीव येतात.