उन्हाळ्यात या प्रसिद्ध धबधब्यांवर सुट्टी करा एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 04:27 PM2018-04-21T16:27:58+5:302018-04-21T16:27:58+5:30
देशातील अशाच काही भव्य आणि सुंदर धबधब्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे जाऊन तुम्ही या उन्हाळ्यातील सुट्टीचा पूर्णपणे आनंद लुटू शकता.
डोंगर-द-यांना कापत खळखळत खाली कोसळणारं पाणी बघितल्यावर कुणालाही टेन्शन फ्रि झाल्यासारखंच वाटेल. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हालाही असंच टेन्शन फ्रि व्हायचं असेल तर तुम्ही देशातील या खास धबधब्यांना भेट देऊ शकता. देशातील अशाच काही भव्य आणि सुंदर धबधब्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे जाऊन तुम्ही या उन्हाळ्यातील सुट्टीचा पूर्णपणे आनंद लुटू शकता.
1) कुंचिकल फॉल, कर्नाटक
कर्नाटकातील शिमोंगा जिल्ह्यात 455 मीटर उंचीवर असलेला हा धबधबा देशातील सर्वात मोठा धबधबा आहे. भारतातील सर्वात मोठा धबधबा असण्यासोबतच हा आशियातील सर्वात मोठा धबधबा आहे. वाराही नदीतून हा धबधबा निघाला आहे.
2) बरेहिपनी फॉल, ओड़िसा
भारत ओडिशा राज्यातील सिंपल नॅशनल पार्कमधील हा धबधबा 399 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. हा धबधबा भारतातील दुसरा सर्वात मोठा धबधबा आहे. हा धबधबा सुंदर जंगलाने वेढलेला आहे. इथे येऊन तुम्हाला निसर्गाचा अगदी जवळून आनंद घेऊ शकता.
3) नोहकलिकाय फॉल, मेघालय
340 मीटर उंचीवरुन पडणारा हा धबधबा मेघालयातील सुंदर डोंगरांनी वेढलेला आहे. चेरापुंजीजवळ असलेला हा धबधवा पावसाळ्यात आणखी खळखळून वाहतो. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे येतात.
4) नोहस्गिथियांग जलप्रपात, मेघालय
रशियातील लोकप्रिय सेव्हन सिस्टर वॉटरफॉलच्या नावाने ओळखला जाणारा हा भारतातील चौथा सर्वात मोठा धबधबा आहे. मेघालयातील खासी पहाडी जिल्ह्यातील मावासी गावाजवळ हा धबधबा आहे. 315 मीटर उंचीवरून खाली कोसळणा-या या घबधब्याची रुंदी 70 मीटर आहे. उत्तर पूर्व भारतात असे अनेक धबधबे आहेत. इथे तुम्ही ट्रेकिंगही करु शकता.
5) दूधसागर, गोवा
गोव्यातील या धबधब्याची उंची 320 मीटर इतकी आहे. या धबधब्याचा जलस्त्रोत मांडोवी नदी आहे. हा धबधबा कर्नाटक आणि गोवा सीमेवर असून इथे तुम्हाला ट्रेकिंगही करता येतं.