दोन प्रेम करणाऱ्यांसाठी तशी कोणत्याही स्पेशल जागेची गरज नसते. मनात प्रेम असेल तर त्यांच्यासाठी सर्वच जागा स्पेशल ठरु शकतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा जागेबाबत सांगणार आहोत जी केवळ कपल्ससाठी खास मानली जाते. या जागेचं वेगळेपण म्हणजे या ठिकाणी जगभरातील कपल्स किस करण्यासाठी येतात. या स्ट्रीटला किसींग स्ट्रीट असेही म्हटले जाते. तशी तर वर्षभर इथे कपल्सची गर्दी असते पण खासकरुन व्हॅलेंटाईनला इथे जास्त गर्दी बघायला मिळते. चला जाणून घेऊया या खास ठिकाणाबाबत.....
कुठे आहे हे किसींग स्ट्रीट?
मेक्सिको हे शहर आपल्या सुंदरतेसाठी चांगलंच प्रसिद्ध आहे. लोक इथे खासकरून हनीमून साजरा करण्यासाठीही येतात. याचं कारण म्हणजे येथील रोमॅंटिक वातावरण आणि किसींग स्ट्रीट. इथे साइड सीन्ससाठी खूप ठिकाणे आहेत पण किसींग स्ट्रीटची बातच वेगळी सांगितली जाते. इथे कपल्स किस करण्यासाठी एका लाईनमध्ये बघायला मिळतात.
काय आहे याची मान्यता
लाइनमध्ये लागून आपला नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या कपल्समध्ये अशी मान्यका आहे की, सा स्ट्रीटवर किस करणारे कपल्स नेहमीसाठी एकत्र राहतात. या गल्लीचं नाव एल कॅलेजन डेल बेसो असं आहे. पण या गल्लीला अनेकवर्षांपासून किसींग स्ट्रीटच्या नावानेच ओळखलं जातं.
काय आहे या किसींग स्ट्रीटचा इतिहास
या गल्लीमध्ये राहणारे लोक सांगतात की, अनेकवर्षांपूर्वी या गल्लीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी राहत होती. मुलीचं नाव डोना कार्मेन होतं. ती फार श्रीमंत घरातील होती. तर मुलगा लुईस गरीब परिवारातील होता. डोना वडीलांचा तिच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे लुईसने डोनाच्या घरासमोरच एक घर भाड्याने घेतलं. दोघांच्याही घरच्यांना हे माहीत नव्हतं. दोघेही या गल्लीत एकत्र वेळ घालवत होते. किस करत होते. पण जेव्हा डोनाच्या वडीलांना हे कळालं तेव्हा त्यांनी डोनाही हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर कपल्सनी इथे जमा होऊन एकमेकांना किस करून या घटनेचा निषेध नोदंवला.
या ठिकाणाबाबत सांगण्यात येणाऱ्या या गोष्टीत किती सत्यता आहे हे सांगता येणं कठिण आहे. पण या गोष्टीने प्रेरित होऊन लाखोंच्या संख्येने कपल्स इथे येऊन किस करतात. हळूहळू या एका फेस्टिव्हलचं रूप मिळालं.