पैसा वसूल ट्रिपसाठी देश-विदेशातील ६ ऑफबीट डेस्टिनेशन्स, या ठिकाणांच्या पडाल प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:11 PM2019-05-13T13:11:36+5:302019-05-13T13:11:43+5:30

फिरण्याची आवड असणारे अनेकजण काहीना काही नवीन ट्राय करत असतात. मग ते देशात आणि परदेशातील वेगवेगळ्या खास ठिकाणांचा शोध घेतात.

Unique places to spend your holidays | पैसा वसूल ट्रिपसाठी देश-विदेशातील ६ ऑफबीट डेस्टिनेशन्स, या ठिकाणांच्या पडाल प्रेमात!

पैसा वसूल ट्रिपसाठी देश-विदेशातील ६ ऑफबीट डेस्टिनेशन्स, या ठिकाणांच्या पडाल प्रेमात!

googlenewsNext

फिरण्याची आवड असणारे अनेकजण काहीना काही नवीन ट्राय करत असतात. मग ते देशात आणि परदेशातील वेगवेगळ्या खास ठिकाणांचा शोध घेतात. तुम्हीही अशाच काही वेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. ही देश-विदेशातील ठिकाणे नक्कीच तुम्हाला एक वेगळा देतील. 

कक्कानाडमध्ये कॅंपर व्हॅन रोड ट्रिप

(Image Credit : TripAdvisor)

६०च्या दशकात जे लोक इथे फिरत होते, त्यांनी कॅंपर व्हॅन ट्रॅव्हल संकल्पनेची सुरूवात केली होती. हा त्या काळातील वेगळा अनुभव कक्कानाडच्या हिरव्या डोंगरांमधून देण्याचा प्रयत्न केला जातो. कॅम्पमध्ये राहून केरळच्या सर्व सुविधा असलेल्या ट्रेलरमध्ये बसून तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. 

१०० वर्ष जुना केडाकाल बंगला

(Image Credit : TripAdvisor)

तुम्ही जर एका तणामुक्त ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हे परफेक्ट ठिकाण ठरू शकतं. कर्नाटकातील केडाकालमध्ये एक १०० वर्ष जुना बंगला असून त्याला केडाकाल बंगला म्हणूणच ओळखलं जातं. यां बंगल्यात राहण्याचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळू शकतो. 

जेसलमेरमध्ये बटरफ्लाय टेंट्स

(Image Credit : redBus)

तुम्ही वेगळा अनुभव घेण्यासाठी जेसलमेरच्या वाळवंटात रंगीबेरंगी बटरफ्लाय टेंट्समध्ये राहू शकता. रात्री इथे बॉनफायर असतं, जिथे तुम्ही परिवारासोबत चांगला वेळ घालवू शकता. वाळवंटाच्या मधोमध शेणापासून तयार केलेल्या झोपड्याही आहेत. 

अंडरवॉटर म्युझिअम

(Image Credit :SFGate)

कॅन्कूनमध्ये असलेल्या या अंडरवॉटर म्युझिअममध्ये ४०० पेक्षा जास्त मूर्ती आहेत. समुद्राच्या आता जाऊन या मूर्ती आणि त्यांच्या आजूबाजूला फिरणारे वेगवेगळे मासे बघणे नक्कीच एक वेगळा अनुभव देणारं असेल. 

पॅनकेक रॉक्स, न्यूझीलंड

न्यूझीलंडच्या पापारोआ नॅशनल पार्कच्या पश्चिम किनाऱ्यावर पॅनकेक रॉक्स बघायला मिळतात. लाइमस्टोन आणि सॅंडस्टोन एकत्र जमिनीवर जमा झाले होते. सॅंडस्टोन लाइमस्टोनपेक्षा जास्त गरम असल्याने लवकर घासले जाऊ लागले. या प्रक्रियेमुळे मोठ्या दगडांनी पॅनकेक्ससारखं रूप घेतलं. ही प्रक्रिया ३० मिलियन वर्षांआधी सुरू झाली होती. 

अल्बरोबेलो, इटली

(Image Credit : Booking.com)

१९९६ मध्ये अल्हरोब्लोतील 'टूली' वर्ल्ड हेरिटेज साइट झालं होतं. १४व्या शतकातील इटलीच्या या छोट्याशा शहराला काउंट ऑफ कॉन्वर्सेनोपासून तयार करण्यात आलं होतं. या शहरातील सर्वच घरे टूली आहेत. या घरांसाठी इंटरलॉकिंग दगडांचा वापर करण्यात आला होता.  

Web Title: Unique places to spend your holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.