महागड्या हॉटेल्ससाठी नाही तर शानदार होमस्टेसाठी प्रसिद्ध आहे हे हिल्स स्टेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:43 PM2018-10-22T14:43:08+5:302018-10-22T14:44:10+5:30
मनाली शहराचा उल्लेख झाला की, सर्वात पहिले डोळ्यांसमोर चारही बाजूंनी बर्फाने झाकलेले डोंगर, रस्ते आणि हनीमून कपल्सची गर्दी येते.
(Image Credit : www.oyorooms.com)
मनाली शहराचा उल्लेख झाला की, सर्वात पहिले डोळ्यांसमोर चारही बाजूंनी बर्फाने झाकलेले डोंगर, रस्ते आणि हनीमून कपल्सची गर्दी येते. पण फार कमी लोकांना माहीत नाही की, येथून जवळच एक वशिष्ठ नावाची जागा आहे. जी सुंदर असण्यासोबतच शांतही आहे. जुन्या मनालीला जाणून घेण्यासाठी वशिष्ठ शहराला भेट देणे एक चांगला अनुभव ठरु शकतो. मनालीपासून ३ किमी अंतरावर रावी नदीच्या किनारी हे गाव वसलं आहे. वशिष्ठ हे गाव गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी आणि मंदिरांसाठी फार प्रसिद्ध आहे.
वशिष्ठ मंदिर
इथे भगवान राम आणि ऋषी वशिष्ठ यांची अनेक मंदिरे बघायला मिळतात. पण सर्वात खास म्हणजे वशिष्ठ मंदिर. जे ट्रेडिशनल स्टाइलने बांधलं गेलं आहे. मंदिरात वापरण्यात आलेल्या लाकडावर अनेक सुंदर नक्षीकामे करण्यात आली आहेत. मंदिराच्या आत ऋषी वशिष्ठ यांची मूर्ती आहे.
जर्मन बेकरी
या बेकरीमध्ये तुम्हाला टेस्टी अॅपल पायपासून ते कॅरोट केक आणि अनेक प्रकारचे रोल्स मिळतील. त्यासोबतच कॉफी, शेक्स, मोमोज आणि ब्रेकफास्टची वेगवेगळी व्हरायटीही मिळेल.
जोगिनी वॉटरफॉल
उंचच उंच डोंगरातून पडणाऱ्या पाण्याचा धारा बघण्याची आवड असेल तर जोगिनी वॉटरफॉल येथून फार जवळ आहे. आजूबाजूची सुंदरता आणि शांततेसाठीही हे ठिकाण बेस्ट आहे. इथेच जोगिनी मातेचं मंदिरही आहे.
वॉटर रॉक क्लायंबिंग
जर तुम्हाला अॅडव्हेंचरची आवड असेल तर तुम्ही वशिष्ठमध्ये वॉटर क्लायंबिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. यात तुमच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली जाईल.
वर्ल्ड पीस कॅफे
सुमधूर संगीतासोबत मनालीच्या सुंगर दऱ्यांना बघणे आणि त्यासोबतच इंटरनॅशनल पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर इथे भेट द्या.
कुठे थांबाल?
वेगवेगळ्या हिल्स स्टेशनवर हॉटेल्स आणि पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. तर इथे राहण्यासाठी शानदार होमस्टेजचा पर्याय आहे. घरासारखं फिलिंग देणाऱ्या होमस्टे सेवेत सर्वप्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. इथे तुम्ही चहा-कॉफी घेत बाल्कीनीतून वेगवेगळे नजारे बघू शकता.
कसे पोहोचाल?
देशातील मोठमोठ्या शहरांमधून मनालीसाठी बसेस असतात. मनालीपासून हे गाव केवळ ३ किमी अंतरावर आहे.