जगण्याच्या धावपळीत आपण स्वत:ला विसरत चाललो आहोत. अनेकदा आजूबाजूला काय सुरू आहे? जगभरात काय सुरू आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतात. पण कधी कधी आपला मूड चांगला का नाही? याचं उत्तर आपल्याकडे नसतं. याचं कारण म्हणजे आपण आपल्याला हवा तो वेळ देत नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वत:शी नातं अधिक घट्ट करू शकता. तुम्ही नव्याने जगायला शिकू शकता. यासाठी तुम्ही खालील ५ ठिकाणांना भेट देऊ शकता. इथे तुम्ही योगाभ्यासाच्या माध्यमातून स्वतात डोकावून बघू शकता.
Bhakti Kutir, Goa
(Image Credit : www.bhaktikutir.com)
गोवा हे केवळ मनोरंजन किंवा मजा-मस्तीसाठीचं ठिकाण नाही. इथे वेगवेगळे रिट्रीट हाऊसही आहेत. पॅलोलममध्ये भक्ती कुटीर हे एक योगा रिट्रीट आहे. जिथे तुम्हाला निसर्गासोबत पुन्हा जुळण्यासाठी आवश्यक वातावरण आणि संधी मिळते. भक्ती कुटीर हे २ एकर परिसरात पसरलेलं आहे. इथे दूरदूरपर्यंत तुम्हाला केवळ नारळाची उंचच उंच झाडे बघायला मिळतात. येथील शांतता तुमच्या मनाला वेगळीच शांतता देणारी आहे. आहारात इथे व्हेजिटेरियन आणि वेगन असे दोन पर्याय मिळतात.
Kalari Kovilakom, Kerala
(Image Credit : TripAdvisor)
कलारी कोलविलकोम केरळमधील सर्वात चांगलं रिट्रीट सेंटर आहे. इथे तुम्हाला केरळमधील वेगवेगळे योगाभ्यास आणि उपचार करता येतात. इथे तुम्हाला स्वत:साठी चांगली वेळ घालवता येईल. हिरवेगार नजारे, खवळणारा समुद्र किनारा तुम्हाला स्वत:शी संवाद साधण्याची संधी देतो. तसेच इथे तुम्ही नैसर्गिक उपचारांच्या माध्यमातून स्वत:ला डीटॉक्स करू शकता.
Osho Meditation Resort, Pune
(Image Credit : tripadvisor.in)
पुणे शहरातील ओशो मेडिटेशन रिसॉर्टही यापैकी एक आहे. इथे राहण्याची फार चांगली सोय आहे. हे सेंटर साधारण २८ एकर परिसरात पसरलेलं आहे. इथे वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही मानसिक शांतता मिळवू शकता. इथे तुम्ही स्वत:शी एक नातं पुन्हा जुळवू शकता.
Tushita Meditation Centre, Dharamsala
(Image Credit : HolidayIQ)
हिमाचलचं सुंदर हिल स्टेशन म्हणजे धर्मशाला. इथे सुंदर डोंगर-दऱ्या आणि सुंदर वातावरणात ध्यान केंद्रात वेळ घालवणे आणि योगाभ्यास करणे तुम्हाला जीवनाच्या फार जवळ घेऊन जाणारं ठरेल. तिबेटीयन संस्कृती आणि बौद्ध धर्माची महायान परंपरेचं घर म्हणून येथील तुशिता मेडिटेशन सेंटर प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्घतीचा अभ्यास करू शकता. हे ठिकाण धर्माशालातील सर्वात चांगल्या ध्यान केंद्रांपैकी एक आहे. आजूबाजूचं जंगल ध्यान साधनेसाठी आवश्यक शांतता देतं.
Art of Living Ashram, Bangalore
(Image Credit : TripAdvisor)
हे प्रसिद्ध आध्यत्मिक गुरू रविशंकर यांचं मुख्यालय आहे आणि हे आश्रम साधारण ६५ एकर परिसरात पसरलेलं आहे. डोंगर, जंगल, तलाव यामुळे या आश्रमाला वेगळं स्थान आहे. इथे तुम्ही योगाभ्यासासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंगचे बारकावे शिकू शकता. स्वत:ला आनंदी आणि फिट ठेवण्याच्या पद्धती तुम्ही इथे जाणून घेऊ शकता.