"भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:51 PM2024-01-18T12:51:27+5:302024-01-18T12:59:04+5:30

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरुच

BJP is trying to own Lord Ram and insulting people says Akhilesh Yadav | "भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका

"भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका

Ram Mandir, Akhilesh Yadav vs BJP: भाजपामुळे श्रीराम अयोध्येत येतात हा भ्रम आहे. उलट श्रीरामामुळे भाजपा सध्या थोड्या काळासाठी सत्तेत आहे. प्रभूश्रीराम हे जनतेसोबत आहेत. पीडीए (प्रोगेसिव्ह डेमॉक्रेटिक अलायन्स) हे जनतेसाठी काम करत आहे. भाजपवाले देव आणत नाहीयेत, तर देवामुळे भाजप काही प्रमाणात यशस्वी होत आहे. पण आमच्यासाठी पीडीएच हाच देव आहे. भाजपा श्रीरामावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न का सुरू आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनताच यावर भाजपाला जोरदार उत्तर देईल, अशा शब्दांत सपा नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टीका केली. बाराबंकी येथे त्यांनी हे विधान केले.

"इंडिया ब्लॉक मजबूत असला पाहिजे... सर्व पक्षांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आघाडी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इतर पक्षही आमच्या आघाडीत सहभागी व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. समाजवाद्यांनी देशाचा पंतप्रधान हा त्या वर्गातील असावा असे स्वप्न पाहिले होते. समाजवाद्यांनी सर्व विरोधी पक्षांना महाआघाडीत आणण्याचे काम केले आहे. बसपला सन्मान देण्याचे काम आम्ही केले आहे. मात्र मायावतींकडून ज्या प्रकारची वक्तव्ये येत आहेत, त्यावरून त्या काहीशा दडपणाखाली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता काही बोलताना दिसत नाहीत," असा टोला त्यांनी लगावला.

जागावाटपावर होणार चर्चा

काँग्रेसच्या इंडिया ब्लॉकची पुढील बैठक समाजवादी पक्षासोबत होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रीय लोकदलाशी थेट चर्चा करणार नाही. आरएलडीसोबतची युती सपामधूनच होईल. कारण तो प्राथमिक सहकारी आहे. दुसरीकडे, जागावाटपाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होऊ शकते, त्यामुळे 'आप'सोबत जागावाटपाची घोषणा करण्यापूर्वी आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर काही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती यादव यांनी दिली.

Web Title: BJP is trying to own Lord Ram and insulting people says Akhilesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.