१० अल्पवयीन कुटुुंबीयांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:17 PM2018-12-12T23:17:54+5:302018-12-12T23:18:13+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान अनावधानाने कुटुुंबीयांपासून काही मुल व मुली दुरावले. सदर अल्पवयीन मुल आणि मुली भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाले. त्यापैकी दहा अल्पवयिनांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे प्रवासादरम्यान अनावधानाने कुटुुंबीयांपासून काही मुल व मुली दुरावले. सदर अल्पवयीन मुल आणि मुली भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाले. त्यापैकी दहा अल्पवयिनांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. इतकेच नव्हे तर जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सहा अल्पवयीन मुलींना तसेच तीन अल्पवयीन मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चाईल्ड लाईन संस्थेच्या हवाली केले आहे.
जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत अवैध दारू तस्करी बाबतचे सात गुन्हे रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. शिवाय मोठ्या प्रमाणात दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे. तर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चार लाख रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड ताब्यात घेत ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. धावत्या रेल्वेत प्रवाशांचे साहित्य पळविणाºया दोन चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. या आरोपींना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाई नागपूर विभागाचे वरिष्ठ रेल्वे सुरक्षा मंडळ अधिकारी ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.