लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वस्त धान्य दुकानात गरजवंतांकरिता आलेला गहू काळ्या बाजारात विकणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून शासकीय मोहोर असलेले गव्हाचे ५० किलो वजनाचे १०६ पोते जप्त करण्यात आले आहे. कवडघाट येथे शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ५ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अतुल पवन टेकाम (२६) रा. टाकळी (किटे), राहुल महादेव डेकाटे (२२) आणि महादेव डेकाटे दोन्ही रा. वघाळा ता. सेलू अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेला गहू हा सेलू तालुक्यातील वघाळा येथील स्वस्त धान्य दुकानातील असून तो हिंगणघाट येथील बाजारात विक्रीकरिता येत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ३२ पी १४३२ क्रमांकाचा ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात शासकीय गहू घेवून हिंगणघाट येथील बाजारात विक्रीकरीता येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्याचे जमादार निरंजन वरभे यांनी त्यांच्या चमूसह हिंगणघाट-वर्धा मार्गावर कवडघाट शिवारात सापळा रचून माहितीत असलेल्या ट्रॅक्टरची झडती घेतली. या झडतीत ट्रॅक्टरमध्ये असलेला गहू हा शासकीय असल्याचे निदर्शनास आले. शिवाय या ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टर व ट्रॉलीचे तसेच गव्हाबाबत कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे दिसले.यावरून पोलिसांनी सदर ट्रॅक्टर जप्त करून ठाण्यात आणला. येथे ट्रॅक्टर चालक टेकाम याच्या मोबाईलवरून संपर्क साधला असता सदर गहू हा वघाळा येथील स्वस्त धान्य दुकानमालक महादेव डेकाटे यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी तिनही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्यासह जमादार निरंजन वरभे, अरविंद येणूरकर, दीपक जंगले, निलेश तेलरांधे यांच्यासह पोलिसांच्या चमूने केली.हिंगणघाटात गत महिन्यातही आढळला होता साठाजिल्ह्यात धान्याच्या काळ्या बाजाराची प्रकरणे उघड होत आहे. गत महिन्यात वर्धेसह हिंगणघाट आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे जात वर्धा पोलिसांनी कारवाई केली. मात्र या प्रकरणाचा तपास सध्या थंडबस्त्यात असताना यातच आज सेलू येथून धान्यसाठा घेवून हिंगणघाट येथे विकणाºया स्वस्त धान्य दुकान मालकाला अटक करण्यात आल्याचे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. यामुळे येथे घडलेल्या धान्याच्या जुन्या प्रकरणांचा तपास होणे गरजेचे झाले आहे.
शासकीय गव्हाचे १०६ पोते जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:24 AM
स्वस्त धान्य दुकानात गरजवंतांकरिता आलेला गहू काळ्या बाजारात विकणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून शासकीय मोहोर असलेले गव्हाचे ५० किलो वजनाचे १०६ पोते जप्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्देतिघांना अटक : धान्याचा काळाबाजार