११५ उमेदवारांमध्ये होणार मतांसाठी झुंज
By admin | Published: November 13, 2016 12:41 AM2016-11-13T00:41:33+5:302016-11-13T00:41:33+5:30
स्थानिक नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ तर ९ प्रभागाच्या नगर सेवक पदाकरिता
प्रचाराच्या रणधुमाळीला प्रारंभ : बंडखोर व अपक्षांमुळे नगराध्यक्षाची लढत रंगणार
पुलगाव : स्थानिक नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ तर ९ प्रभागाच्या नगर सेवक पदाकरिता राजकीय पक्ष आणि अपक्ष असे १०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता ११५ उमेदवारांमध्ये निवडणुकीची झुंज रंगणार असून बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे लढतीमध्ये रंगत वाढणार आहे. यातही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चढाओढ पाहावयास मिळणार असल्याचे चित्र आहे.
नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. १ अ मध्ये नारायण आत्राम, रितेश मडावी, चंद्रकांत (प्रफुल्ल) कुमरे व प्रशांत उईके तर (ब) मध्ये सीमा मेश्राम, बेबी पाटील, सोनाली खापर्डे, पुनम सावरकर, विद्या वलिवकर हे उमेदवार रिंगणात आहे. प्रभाग २ अ मध्ये रमा शामकुवर, सुनीता डहाके, शालवंती दाबोडे, जमना खोडे तर ब मध्ये रवींद्र झाडे, दीपक छालीवाल, शेख फिरोज, नारायण भेंडारकर, विलास जाधव, प्रशांत बोरकुटे, सुनील ब्राह्मणकर रिंगणात आहे. प्रभाग ३ अ मध्ये जयभारत कांबळे, स्वप्नील रामटेके, नितीन तुर्के, प्रफुल काळे, दिलीप मेश्राम तर ब मध्ये सारिका धामोडे, चंपा सिद्धानी, स्वाती कुचे, योगिता साहू, अलका चोबे रिंगणात आहे. प्रभाग ४ अ मध्ये अनिस अहमद कुरेशी, राजन चौधरी, विजय धोपटे, राजीव जायसवाल तर ब मध्ये पंचफुला रावेकर, रेखा बढिये, ममता वडगे, कल्पना शुक्ला व निर्मला बगमारे रिंगणात आहे. प्रभाग ५ अ मध्ये जयश्री बरडे, सोनाली काळे, प्रणिता येंडे तर ब मध्ये नंदकिशोर मोहोड, गौरव दांडेकर, प्रवीण पनिया, रविशंकर केशरवानी, मांगीलाल व्यास, विनोद बाभुळकर रिंगणात आहे. प्रभाग ६ अ मध्ये माधुरी इंगळे, संगीता गांजरे, पूजा डाफे, रंजना कडू, ललिता ढोले, सुशिला अतुरकर तर ब मध्ये अब्दुल नाझीम अब्दुल करिम, बादल नेहारकर, आशिष गांधी, गजेंद्र गालपेलिवार, दत्तात्रय खेडकर, विजय दुधे, विलास शिर्सीकर, डेव्हिड जेकब रिंगणात आहे. प्रभाग ७ अ मध्ये करुणा टेंभुर्णे, छाया चव्हाण, पुनम नंदेश्वर, मंगला अंबादे, कांचन कोटांगळे, जितू परिहार, सदानंद टेंभुरकर तर ब मध्ये अवधुत दुपारे, प्रकाश टेंभुर्णे, स्वप्नील दुबे, इरफान खान, अली जावेद परवेज, अमोल कोल्हे रिंगणात आहे. ८ अ मध्ये अर्चना लोहकरे, सोनाली फुलझेले, शीतल सहारे, प्रेमा माहुरे, रोशनी खडसे तर ब मध्ये अरुण रामटेके, प्रमोद नितनवरे, यशवंत भगत, मिलिंद कोचे, ज्ञानेश्वर माहुरे, अमोल कांबळे, चंद्रकांत वाघमारे, सैयद युसुफ अली, बेग रज्जाक, इस्माईल रिंगणात आहे. प्रभाग ९ अ मध्ये नितेश रावेकर, चंद्रकला डोईफोडे, संदीप ताकसांडे, प्रशांत मेहरे, दिवाकर लोखंडे, शेषराव वानखडे, महेंद्र पानतावणे, अशोक रामटेके तर ब मध्ये हिरा पाटणकर, शोभा ठवकर, नंदा भटकर, मंदा हळदे, प्रीती सावसाकडे, पठाण हनिफा बेगम असे १०३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
या निवडणुकीमध्ये सर्वात कमी ३ उमेदवार प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये तर सर्वाधिक ९ उमेदवार प्रभाग क्रमांक ६ ब आणि ८ ब मध्ये निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ११५ उमेदवारांमध्ये राजकारणाचा फड रंगणार असून रविवारपासून प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ होणार आहे.(तालुका प्रतिनिधी)
बंडोबा आणि अपक्ष उमेदवारांमुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे आव्हान
नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमदेवार उतरविले आहेत. बहुतांश पक्षांनी विद्यमान नगर सेवकांची उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊन ‘मतदार आणि राजकीय पक्ष नवीन चेहऱ्यांच्या शोधात’ हे ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरविले. विद्यमान सत्तारुढ काँग्रेस आणि सत्तेतील विरोधी पक्षाने आपल्या विद्यमान नगर सेवकांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी केली. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी नामांकनपत्र दाखल केल्याने काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेपूढे बंडोबा आणि अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान राहणार आहे. मनधरणीनंतरही अनेक बंडखोर व अपक्षांनी उमेदवारी मागे न घेतल्याने निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे दिसते.
सद्यस्थितीत काँग्रेस १०, भाजपा ५, सेना १ आणि अपक्ष ३ अशी नगर सेवकांची संख्या आहे. यात काँग्रेसने १० पैकी ८ नगरसेवकांना तर भाजपाने ५ पैकी एकालाही उमेदवारी दिलेली नाही. शिवसेनेने मात्र आपल्या विद्यमान नगर सेवकांनाच उमेदवारी दिली. यामुळे काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. पक्षाविरुद्ध दंड थोपटल्याने प्रचाराची धुमश्चक्री रंगणार आहे.
काही ठिकाणी जातीय समिकरण तर काही ठिकाणी समाजाचे एकत्रिकरण प्रचारातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगर पालिकेवर झेंडा फडकविण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करीत असले तरी सुज्ञ मतदार यावेळी मुलभूत हक्क व विकासाचा मुद्दा पुढे रेटत उमेदवारांना जाब विचारणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगताना दिसत आहे.
वाढत्या गुलाबी थंडी सोबतच सध्या निवडणुकीच्या भेटी, गोष्टी, चहापाणी रंगताना दिसून येत आहे. सकाळपासूनच विविध पक्षाचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या दारी जातना दिसून येत आहे. निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे.
सध्या राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस, भाजपाचे खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे आदी शहरात मतदारांच्या भेटी घेण्यासाठी दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि बसपा यांचा प्रचारही भेटीगाठीतून सुरू झाला आहे. रविवारपासून प्रचाराचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार आहे.