लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शाळा उघडण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड टेस्ट क्रमप्राप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सध्या कोविड टेस्ट सेंटरवर जावून स्वॅब देत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४०० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी केली असून त्यापैकी केवळ २४ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठेवून सध्या प्रत्येक तालुकास्तरावरील कोविड टेस्ट सेंटरवर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्वत: येऊन आपला स्वॅब देत आहेत. जिल्ह्यात सुमारे ३ हजार ३३६ शिक्षक असून शुक्रवार २० रोजीपर्यंत २ हजार ४०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड टेस्ट केल्या आहेत. या व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यावर त्यापैकी २४ शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याचे सांगण्यात आले.आरटीपीसीआर कोविड चाचणी गोल्ड स्टॅन्डरचॲन्टीजेन तसेच आरटीपीसीआर पद्धतीचा अवलंब करून जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत. असे असले तरी ॲन्टीजेन पद्धतीचा अहवाल अवघ्या काही मिनीटांत प्राप्त होतो. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल काही तासांत येतो. असे असले तरी आरटीपीसीआर पद्धती ही गोल्ड स्टॅन्डर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी या दोन्ही प्रकारे वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत.
24 गुरूजींना ‘कोविड’चा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 5:00 AM
कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठेवून सध्या प्रत्येक तालुकास्तरावरील कोविड टेस्ट सेंटरवर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्वत: येऊन आपला स्वॅब देत आहेत.
ठळक मुद्देतालुकास्थळांवर चाचणी : २ हजार ४०० शिक्षक, कर्मचाऱ्यांची झाली टेस्ट