अधिकाऱ्यानेच घातला बँकेला ६० लाखांचा गंडा
By admin | Published: June 10, 2017 01:16 AM2017-06-10T01:16:01+5:302017-06-10T01:16:01+5:30
येथील बँक आॅफ बडोदा येथे कार्यरत असलेल्या एका शाखा अधिकाऱ्याने बनावटी अर्ज तयार करून बँकेला
शहर ठाण्यात गुन्हा दाखल : बनावटी कागदांवर केली क्रेडीट लिमिट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील बँक आॅफ बडोदा येथे कार्यरत असलेल्या एका शाखा अधिकाऱ्याने बनावटी अर्ज तयार करून बँकेला तब्बल ६० लाखाची के्रडीट लिमिट तयार करीत गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या याप्रकरणी मनीष पतीराम अंबादे रा. वास्तुविश्व अपार्टमेंट सावंगी(मेघे) यांनी शुक्रवारी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी तत्कालीन शाखाधिकारी ईश्वर मारोतराव कुंभारे (५५) रा. हुडकेश्वर रोड, नागपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रानुसार, ईश्वर कुंभारे हे ११ आॅगस्ट २०१४ ते ९ मे २०१४ या कालावधीत बँक आॅफ बडोदा येथे शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत सौर उर्जा नावाने खाते उघडण्याचे बनावटी अर्ज तयार करून ६० लाखांची क्रेडीट तयार करीत बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी ईश्वर कुंभारे याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.