७३५ शेतकऱ्यांनी दिली ‘समृद्धी’करिता जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:00 AM2019-03-03T00:00:29+5:302019-03-03T00:00:55+5:30
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. जिल्ह्यात ८६.८ टक्के क्षेत्र संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३५०.४२ कोटी १७ लाख ७ हजार ९५ रुपयांचे वाटप मोबदल्याच्या रूपाने करण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा, सेलू, आर्वी तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातील ३९९, वर्धा तालुक्यातील २९२ व आर्वी तालुक्यात १८५ शेतकरी खातेदारांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २५७.०६२, वर्धा तालुक्यात २०६.१७२ व आर्वी तालुक्यात ११६.२३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७७३ शेतकऱ्यांकडून संमती मिळविण्यास शासनाला यश आले आहे. यामध्ये सेलू तालुक्यात संपूर्ण ३३९ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आल्या. तर वर्धा तालुक्यात २९२ पैकी २७१ शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या.
आर्वी तालुक्यात १८५ पैकी १६२ शेतकºयांकडून जमीन देण्याबाबत संमती मिळविण्यात आली. ७७३ शेतकºयांनी महामार्गाला जमीन देण्यास संमती दर्शविली असली तरी ७३५ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्यात आले आहे. उर्वरित १४१ शेतकºयांकडून खरेदी खत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सेलू तालुक्यात ६८, वर्धा तालुक्यात ५२ व आर्वी तालुक्यात २० शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. शेतकºयांकडून जमिनी खरेदी करून सेलू तालुक्यात २२१.५८४६ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात १७५.६२२, आर्वी तालुक्यात १०१.६१ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४९८.८१६६ हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. उर्वरीत ८०.६४७४ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेलू तालुक्यात खरेदी खत झालेल्या खातेदारांची टक्केवारी ८२.९५ टक्के असून वर्धा तालुक्यात ८१.८४ आर्वी तालुक्यातील ८९.१८ टक्के शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या आहे. या शेतकºयांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. समृद्धीबाबत संभ्रमावस्था असल्याने सुरुवातीला जमीन देण्यास शेतकºयांनी नकार दिला होता. मोबदल्यामुळे हा विरोध मावळल्याचे आता चित्र आहे.
सर्वाधिक गावे सेलू तालुक्यातील
महाराष्ट्र समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातून सर्वाधिक १६ गावातून जमीन अधिग्रहणाचे काम करण्यात आले. वर्धा तालुक्यातून १० तर आर्वी तालुक्यातून ८ गावातील शेतकºयांकडून जमिनी महामार्गासाठी घेण्यात आल्या. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि़मी. सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि़मी.तून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे.