आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : येथील मंडळ अधिकारी (महसूल) व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत मिळाली आहे. या इमारतीखे लोकार्पण नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उपस्थिती होती.आंजी (मो.) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये जुने मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय होते. ते मोडकळीस आले होते. त्यामुळे १५ वर्षांपासून मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे ग्राम सचिवालयाच्या छोट्या खोलीमध्ये कार्यरत होते. मोडकळीस झालेल्या इमारतीच्या ठिकाणी १५ लक्ष रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली. त्याचे लोकार्पण झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार मनोहर चव्हाण यांची उपस्थिती होती. सोबतच जि.प. च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरिया, मांडवाच्या पं.स. सदस्य वंदना वाबने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता म्हैसकर, मंडळ अधिकारी शैलेश देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, आंजीचे तलाठी पाथरकर, रूपराव मोरे, ग्राम विकास अधिकारी अंगद सुरकार इत्यादी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता महसुलच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.पांदण रस्त्याची आयुक्तांनी केली पाहणीघोराड : परिसरात पांदण रस्त्याच्या कामाला आ. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने गती मिळाली आहे. त्या रस्त्याची नागपूर विभागाचे आयुक्त अनूप कुमार यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनोने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, बाजार समितीचे संचालक विलास वरटकर यांची उपस्थिती होती. सेलू हिंगणी मार्गावर मोहन माहुरे ते घनश्याम माहुरे यांच्या शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या चर्चेदरम्यान बोंडअळीचा विषय निघाला. यावेळी सुदाम माहुरे, सुरेश माहुरे, वसंतराव माहुरे आदी उपस्थित होते. या पांदण रस्त्यावरील शेतकऱ्यांना वहीवाटीसाठी त्रास होता. याकडे लक्ष दिल्याबद्दल शेतकऱ्यांना आमदाराचे आभार मानले.
आंजीला मिळाले १५ लाखांचे नवे मंडळ कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:15 AM
येथील मंडळ अधिकारी (महसूल) व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत मिळाली आहे. या इमारतीखे लोकार्पण नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कामांना मिळणार गती : १५ वर्षांनंतर मिळाली नवी इमारत