दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत सेवाग्राम-वर्धा मार्गावर चरखा सभागृहाचे काम सुरु आहे. पण; सध्या कामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील सुशोभित क्षेत्र आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले असून अनेकांसाठी तो सेल्फी पॉर्इंट ठरला आहे. हा परिसर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला हस्तातरीत होणार असल्याने अद्यापही पुढाकार घेतला जात नसल्याने प्रतीक्षा कायम आहे.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष जयवंत मठकर यांच्यासह मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व कार्यकारणीने पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सोईसाठी सभागृहाचे निर्माण व्हावे, जेणे करून कमी खर्चात घरातील सभारंभ सपन्न व्हावे. अशा आशयाचा प्रस्ताव शासकडे पाठविण्यात आला होता. याकरिता आश्रम प्रतिष्ठानने जमीन देऊन करारनामा करुन दिला. २०१७ मध्ये शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यात करारनामा करून या कामाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यान्वित यंत्रणेखाली कंत्राटदार मे.जे.पी.एन्टरप्रायजेस, मुंबई यांनी कामाला सुरुवात केली. सल्लागार म्हणून अडारकर असोसिएट्स,मुबंई हे जबाबदारी सांभाळत आहे. एक हजार लोकांसाठी हे सभागृह असून बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, सभागृहातील फर्निचर, दिवे, नळ, आॅडिओ-व्हिडीओ व पथदिव्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.सध्या ते काम थांबल्याचे दिसून येत आहे. बाहेरच्या चरखा परिसराचे सुशोभिकरण करण्यात आल्याने सर्वांचे आकर्षण ठरत आहे. तसेच भिंतीचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. त्यामुळे येथे नागरिक व पर्यटकांचीही संख्या दिवसेेंदिवस वाढत आहे.येथील सेल्फी पॉईट, सिमेंटचे रस्ते, शांतपरिसर आणि संरक्षण भिंतीशी लावण्यात आलेली झाडे खरोखरच भूरळ घालत असल्याने सायंकाळी फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आलेले सभागृहाचे आतापर्यंत हस्तांतरण व्हायला पाहिजे होते पण; ते झालेले नाही. यामागचे कारण अद्यापही कळाले नाही.मुकूंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.सेवाग्राम येथील सभागृहाचे काम पूर्णत्वास गेलेले असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे. आश्रम प्रतिष्ठानच्या मागणीनुसार सभागृहातील साऊंड सिस्टिमध्ये बदल करावा लागणार आहे. सर्व बदल करुन लवकरच हे सभागृह आश्रमकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया केली जाईल.संजय मंत्री, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
आश्रमाला चरखा सभागृहाच्या हस्तांतरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 6:00 AM
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष जयवंत मठकर यांच्यासह मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व कार्यकारणीने पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सोईसाठी सभागृहाचे निर्माण व्हावे, जेणे करून कमी खर्चात घरातील सभारंभ सपन्न व्हावे. अशा आशयाचा प्रस्ताव शासकडे पाठविण्यात आला होता. याकरिता आश्रम प्रतिष्ठानने जमीन देऊन करारनामा करुन दिला.
ठळक मुद्देकामाची गती मंदावली : चरखा सभागृह बनले ‘सेल्फी पाँर्इंट’