बँक आॅफ इंडियाचे एटीएम नेहमीकरिता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:44 PM2017-11-15T23:44:34+5:302017-11-15T23:45:42+5:30

येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Bank of India ATMs are always discontinued | बँक आॅफ इंडियाचे एटीएम नेहमीकरिता बंद

बँक आॅफ इंडियाचे एटीएम नेहमीकरिता बंद

Next
ठळक मुद्देग्राहकांची होते भटकंती: उपाययोजनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहणा : येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता संबंधितांनी तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची मागणी आहे.
बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद करण्यात आल्याने ग्राहकांची निराशा झाली आहे. पोहणा येथे असलेल्या एकमेव एटीएमला नोटाबंदीपासून घरघर लागली होती. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर हे गाव आहे. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील सुमारे ३० गावांचा संबंध या गावाशी असल्याने व हीच त्यांच्यासाठी बाजारपेठ असल्याने अनेक नागरिक दररोज येथे येतात. याठिकाणी बँक आॅफ इंडियाची शाखा असून दुसरी कोणतीही बँक नाही. अनेकजण एटीएमद्वारेच रोकड काढत होते. परंतु, नोटबंदीच्या निर्णयापासून या एटीएमला घरघर लागली. गत दोन महिने नागरिकांना मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. तर अखेर नुकतीच कक्षातून एटीएम यंत्र काढण्यात आले आहे. एटीएम यंत्र दुरूस्त होईल व पूर्ववत एटीएम सुरू होईल अशी अपेक्षा असताना कक्षावरील नामफलकही काढण्यात आला आहे. परिणामी, कायमचेच एटीएम बंद झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Bank of India ATMs are always discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम