शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

अडचणींना धैर्याने सामोरे जा!

By admin | Published: October 11, 2015 12:28 AM

अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे.

वर्धा : अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावून आलेल्या अडचणीच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी धैर्याने पुढे येण्याचे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.नागठाणा रोडवरील अग्निहोत्री महाविद्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, दिलीप अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड आदी उपस्थित होते.तिवारी म्हणाले शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या त्यांच्या लाभाचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला. आपण शिकलो, संघटीतही झालो; पण परिस्थितीशी संघर्षासाठी आपण पुढे येत नाहीत, याची खंत वाटते. अडचणीच्या परिस्थितीवर मात करण्याची धमक आपल्या मनगटात असून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण धैर्याने पुढे यायला हवे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ उभारली. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान गावोगावी राबवून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. जिल्ह्याचे चित्र पालटण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत असलेला लाभ, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण योजना याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. अग्निहोत्री यांनी दैविक, भौतिक आणि आत्मिक परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी अडचणीतून बाहेर पडावा यासाठी येणाऱ्या अडचणींवर नियोजन करून स्थिती बदलण्यासाठी सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. शेतीप्रधान देशात शेतकरी जगला तरच देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन प्रफुल दाते यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)