लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जाती, धर्माच्या नावावर सध्या देशात वातावरण तपले असताना काही गावे अशीही आहेत जे सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखली जातात. आई-वडिलांपासून दुरावलेली तीन वर्षीय जान्हवी मशीद समोर रडत असल्याचे काहींना निदर्शनास आले. यावेळी जाती व धर्माचा विचार न करता काही सुजाण नागरिकांनी तिला घेऊन मंदिराकडे धाव घेतली. तेथे लाऊडस् स्पिकरवर अनाऊसमेंट करण्यात आली. हरविलेल्या जान्हवीच्या समोर आई-वडील पोहोचताच तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ही घटना बुधवारी सकाळी नजीकच्या रसुलाबाद येथे घडली. रसुलाबाद येथे मनसागीर महाराज स्मृतीदिन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी-मिरवणूक व यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी चना टाकळी येथील शंकर बावणे हे पत्नी व तीन वर्षीय मुलीसोबत आले होते. खेळता-खेळता तीन वर्षीय जान्हवी आई-वडिलांपासून दुरावली. सदर मुलगी रसुलाबाद येथील मशीद समोर रडत असल्याचे गावातील काहींच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ रडत असलेल्या मुलीला धीर देत नाव, गाव विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरूवातीला तिच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्या व्यक्तींनी मुलीला घेऊन मंदिर गाठले. तेथे लाऊडस् स्पिकरवर तीन वर्षीय मुलगी मिळाल्याची अनाऊसमेंट करण्यात आली. याच दरम्यान जान्हवीच्या शोधार्थ जीवाचे रान करीत असलेल्या तिच्या आई-वडिलांना ही माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ मंदिर गाठले. आई-वडिलांना बघून घाबरलेल्या आणि रडत असलेल्या जान्हवीच्या चेहºयावर आनंद फुलला होता. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जान्हवीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.सोहळा ठरतोय धार्मिक एकतेचे प्रतीकरसुलाबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मनसागीर महाराज स्मृतीदिन सोहळ्यात विविध जाती व धर्माचे नागरिक सहभागी होतात. येथील हा कार्यक्रम एक प्रकारे धार्मिक एकतेचे प्रतीक आहे.
आई-वडिलांना बघून जान्हवीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:03 PM
जाती, धर्माच्या नावावर सध्या देशात वातावरण तपले असताना काही गावे अशीही आहेत जे सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखली जातात. आई-वडिलांपासून दुरावलेली तीन वर्षीय जान्हवी मशीद समोर रडत असल्याचे काहींना निदर्शनास आले. यावेळी जाती व धर्माचा विचार न करता काही सुजाण नागरिकांनी तिला घेऊन मंदिराकडे धाव घेतली.
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीचा दिला परिचय