सीबीएसई दहावीत मुलांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:41+5:30
जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन्स हायस्कूलचा रुद्राक्ष प्रकाश अनासने या दोघांनाही ९७.२ टक्के गुण मिळाल्याने त्यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाला बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्यातील १७ शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा सामना करुन घवघवीत यश मिळविले. यावर्षी जिल्ह्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मुलांनीच पटकाविल्याने या कोविड काळातील निकालामध्ये मुलींना मागे टाकल्याचे दिसून आले.
हिंगणघाटच्या भारतीय विद्या भवन्स गिरीधरदास मोहता विद्या मंदिरचा विद्यार्थी साहिल राजू मून हा जिल्ह्यातून प्रथम आल्याने शाळेनेही बाजी मारली आहे. साहिलने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन नावलौकीक मिळविला आहे.
जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन्स हायस्कूलचा रुद्राक्ष प्रकाश अनासने या दोघांनाही ९७.२ टक्के गुण मिळाल्याने त्यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांना निकाल शतप्रतिशत लागला असून संचारबंदी आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांसह शाळांनाही कुठेही जल्लोष न करता नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.
गुणवत्ता प्राप्त तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले आहे.