लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील शिरपूर, विजयगोपाल, तांबा व परिसरात उद्भवलेल्या सेंद्रीय बोंड अळीच्या प्रकोपामुळे या भागातील कास्तकार हतबल ठरला. या भागातील कपासीची सर्वच बोंडे सडकी निघाल्याची विदारक स्थिती अनुभवण्यात आली. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व खासदार रामदास तडस यांनी हा परिसर पिंजून काढला.वरिष्ठ अधिकाºयांना निर्देश देत असताना या भागातील कपासीचे पीक शंभर टक्के डॅमेज झाले आहे. याची नोंद घ्या. सर्व कास्तकारांच्या शेतापर्यंत जावून त्यांचे अर्ज भरून घ्या असा दम देवून हा सर्व प्रकार बीटी वाण्याच्या कंपन्याच्या चुकांमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व कंपन्यांची गय न करता त्यांच्यावर शासनाच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात येईल. पीक विमा योजनेच्या माध्यमातून संबंधित कास्तकारांना दिलासा देण्यात येईल अशी ग्वाही पाशा पटेल यांनी उपस्थित कास्तकारांना दिली.तालुकास्तरावर पीक विमा योजनेची माहिती पुरविणारी यंत्रणा नसल्याची खंत व्यक्त करुन खासदार तडस यांनी दोषी असलेल्या बीटी कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यासाठी कृषी दुकानदारांना वेठीस धरले जावू नये. असेही त्यांनी सांगितले.जि.प.चा व राज्याचा कृषी विभाग कोणता हे कळण्यास मार्ग नाही. या विभागाचे सर्व अधिकारी काही एक कारणे दाखवून मुंबई-दिल्लीला असतात. अधिकाºयांच्या लहरीपणामुळे कास्तकार अडचणीत आला आहे. पीक विम्याचे पैसे फक्त दहा टक्के लोकांना मिळाले. उर्वरित नव्वद टक्के कास्तकार अजूनही उपेक्षित आहे. अश्या प्रकारची कथा जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी व्यक्त केली.या आढावा दौºयात पाशा पटेल यांचे सोबत प.स. सभापती विद्या भुजाडे, प.स. सदस्य स्वप्नील खडसे, शंकर उईके, मिलींद भेंडे, दीपक फुलकरी, संजय बमनोटे, दशरथ भुजाडे, जिल्हा अधीक्षक मोरे, सेलसुरा कृषीचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मसकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी आर.पी. धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी एस.जी. वानखेडे, प.स. कृषी अधिकारी प्रशांत भोयर व इतरांची उपस्थिती होती.शेतकºयांनी मांडल्या व्यथापाच एकरात एक जून रोजी प्री- मान्सून पºहाटी लावली. मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. परंतु झाडावर लटालट लागलेली व संपूर्ण बोंडे सडकी निघाली. बोंडात कापूस दाखवून द्या व हजार रुपये बक्षीस मिळवा अश्या प्रकारची हतबलता विजयगोपाल येथील कास्तकार विजय पेटकर यांनी व्यक्त केली. काहींनी पिकावर रोटोवेटर फिरविण्याची परवानगी मागितली. शिरपूर येथील कास्तकार अतुल होरे व इतरांनी कपाशीची दयनीय स्थिती पटेल यांना अवगत केली. बायर, कावेरी, महिको आदी कंपन्यांच्या बियाण्यांनी धोका दिल्याचे सांगितले.
कंपन्यावर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:38 PM
तालुक्यातील शिरपूर, विजयगोपाल, तांबा व परिसरात उद्भवलेल्या सेंद्रीय बोंड अळीच्या प्रकोपामुळे या भागातील कास्तकार हतबल ठरला.
ठळक मुद्देपाशा पटेल : शिरपूर विजयगोपाल शिवारात कपाशीची सर्वच बोंडे सडकी