लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या गावात मागील दोन वर्षांपासून पोलीस ठाण्याचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. पोलीस ठाण्याचे बांधकाम कधी पूर्णत्वास जाणार, असा सवाल पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांतून केला जात आहे.पोलीस ठाण्याच्या इमारतीचे २८ सप्टेंबर २०१८ नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. ऑक्टोबर २०१८ मध्येच या इमारतीच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत प्रत्यक्षात सुरुवात झाली.पूर्वी येथे केवळ पोलीस चौकी अस्तित्वात होती. गुन्हेगारीचा आलेख पाहता पोलीस चौकीचे २०१३ मध्ये पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली. मात्र, ज्या जागेत पोलीस चौकी होती, त्याच तोकड्या जागेत कामकाज सुरू आहे. पोलीस कर्मचाºयांच्या संख्येने कामकाज करण्यास ती जागा तोकडी पडत आहे. कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता निवासी वसाहत नाही. त्यामुळे अनेकांना भाडेतत्त्वावरील घरात राहावे लागते. तर काही कर्मचारी स्वगावातून ये- जा करीत असतात. परिणामी, ठाण्याच्या हद्दीत घडत असलेले गुन्हे व त्याबाबत कराव्या लागत असलेल्या तपासाकरिता वेळीच पोहोचू शकत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर असून येथे अप्पर वर्धा धरणाच्या बाधित क्षेत्रातील ३ ते ४ गावांचे पुनर्वसन झाले आहे. येथील लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. या गावाव्यतीरिक्त आष्टी, आर्वी, कारंजा या तिन्ही तालुके मिळून ४० गावे तळेगाव पोलीस ठाण्याला जोडली आहेत.त्यामुळे या भागात होत असलेल्या गुन्ह्यांच्या तक्रारी मोठ्या संख्येने तळेगाव पोलीस ठाण्यात येतात. तेव्हा तक्रारदारांना तोकड्या जागेअभावी गेटबाहेरच बसावे लागते. पोलीस ठाण्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या ताणामुळे पोलीस ठाण्याची नवी इमारत लवकरात लवकर निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, दोन वर्षे लोटूनही पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले नाही.
पोलीस ठाण्याचे बांधकाम धिम्यागतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 5:00 AM
पूर्वी येथे केवळ पोलीस चौकी अस्तित्वात होती. गुन्हेगारीचा आलेख पाहता पोलीस चौकीचे २०१३ मध्ये पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली. मात्र, ज्या जागेत पोलीस चौकी होती, त्याच तोकड्या जागेत कामकाज सुरू आहे. पोलीस कर्मचाºयांच्या संख्येने कामकाज करण्यास ती जागा तोकडी पडत आहे. कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता निवासी वसाहत नाही.
ठळक मुद्देदोन वर्षांपासून नागरिकांना प्रतीक्षा : कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानेही नाहीत