लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मागील अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरण योजनेसाठी लाखो रूपये खर्चूनही गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणारे फिल्टर खराब झाले असून तेही बदलविल्या जात नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राथमीक आरोग्य केंन्द अल्लीपुर डॉ . ज्योती मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे विषमजोर, पोटाचे आजार, सर्दी, खोकला आदी आजारांच्या साथीचा गावात फैलाव होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.गावाला शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नगावातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात सरपंच नितीन चंदनखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जि.प.च्या मासिक सभेत दूषित पाणीपुरवठ्याचा विषय ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतची चौकशी केली असून गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणाीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
अल्लीपूर येथे दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM
गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजनेचे गावातील पाणीपुरवठ्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, शुद्ध पाण्याची मागणी