पाच दिवसात आठ व्यक्तींचा कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:02+5:30

कोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशाच ७६,१५८ व्यक्तींना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ७२ हजार ९२० व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. तर सध्या ३ हजार २३८ व्यक्ती सध्या गृहविलगीकरणात आहेत.

Corona killed eight people in five days | पाच दिवसात आठ व्यक्तींचा कोरोना बळी

पाच दिवसात आठ व्यक्तींचा कोरोना बळी

Next
ठळक मुद्दे२२६ बाधितांची मात : नवीन ५९६ व्यक्तींना कोविड संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गाफिल प्रशासनासह बिनधास्त नागरिकांमुळे जिल्ह्यात कोविड-१९ या विषाणूचा झपाट्यानेच प्रसार होत असल्याचे दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांत तब्बल आठ व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याचे वास्तव आहे. शिवाय ५९६ नविन कोविड बाधित आढळल्याने नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, १ ते ५ सप्टेंबर या काळात २२६ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याच काळात तब्बल ४ हजार ७३६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निदान झाले आहे. ही बाब वर्धेकरांसाठी दिलासा देणारी असली तरी सध्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे अनेक व्यक्ती दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

३,२३८ व्यक्ती गृह विलगीकरणात
कोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशाच ७६,१५८ व्यक्तींना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ७२ हजार ९२० व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. तर सध्या ३ हजार २३८ व्यक्ती सध्या गृहविलगीकरणात आहेत.

ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कोविड विषाणूची साखळी तोडण्याचे काम होत आहे. मागील पाच दिवसांत आठ कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २२६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोविड मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न होत असले तरी नागरिकांनी दक्ष रहावे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

२,४०० व्यक्तींची झाली ‘सिरो चाचणी’
कोविड विषाणूचा अनावधानाने संसर्ग झालेल्या काही व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत नाहीत. अशातच काही व्यक्ती कुठलेही औषध न घेता रोगप्रतिकारक शक्तीच्या भरोशावर बरीही होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील अशाच व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने सिरो चाचणीसाठी घेण्यात आले. या व्यक्तींचा अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नसून त्याची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्ह्यातील सरासरी किती व्यक्तींमध्ये कोविड-१९ या विषाणूशी लढण्यासाठी अ‍ॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत याची ठोस माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.

रविवारी आढळले नवीन ११६ कोविड बाधित
रविवारी ९५६ व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी ११६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर रविवारी ९७३ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रविवारी दहेगाव येथील रहिवासी असलेल्या ६६ वर्षीय कोविड बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

२१,०१६ व्यक्तींची झाली कोविड टेस्ट
शनिवार ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २१ हजार १६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९ हजार २२५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Web Title: Corona killed eight people in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.