लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आकोली : सुकळी (बाई) व हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे झालेल्या अपघातात दोघे ठार झाले तर मजूर सुखरूप बचावले. दोन्ही अपघात रविवारी झाले.मळणीसाठी कालवामार्गे जाणारे ट्रक्टर अनियंत्रित होऊन मळणी यंत्रासह कालव्यात कोसळले. यात चालक गंगाराम चेनाराम आवसा (३३) याचा जागीच मृत्यू झाला तर मजूर मात्र सुखरूप बचावले. गंगाराम मूळचा राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील नबासूर येथून असून २५ वर्षांपासून सुकळी (बाई) येथे राहत होता. ट्रक्टर क्र. एमएच ३२ ए ५३९३ ने तो मजूर अनिल पचारे, हंसराज बंसोड, संजय कुरवाडे रा. सुकळी (बाई) यांच्यासह जात होता. दरम्यान, अमन अंबुलकर यांच्या शेतात थांबून त्यांनी जेवण केले. मजूर ट्रक्टरवर बसले, असे समजून त्याने ट्रक्टर सुरू केला असता ते अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खरांगणा पोलीस ठाण्याचे किशोर बमनोटे, अमर हजारे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठविला.दुचाकी अपघातात एक ठारवडनेर - भरधाव दुचाकी ट्रकच्या मागील चाकात आल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पेट्रोल पंपाजवळ घडला. दुचाकी क्र. एमएच ३१ बीक्यु ४७१५ ने चंचल मून रा. खापरी (३५) हा पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जात होता. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून पूल तथा सिमेंट कठडे अपूर्ण नाही. याच मार्गाने जाणाºया चंचलची दुचाकी ट्रकच्या मागील चाकात सापडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.
वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:28 PM
सुकळी (बाई) व हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे झालेल्या अपघातात दोघे ठार झाले तर मजूर सुखरूप बचावले. दोन्ही अपघात रविवारी झाले.
ठळक मुद्देवडनेर व सुकळी (बाई) येथील घटना : सुदैवाने मजूर बचावले