वहिवाटीची मोजणी करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:09 AM2018-01-17T00:09:03+5:302018-01-17T00:09:15+5:30
जंगलापूर येथील शेतशिवाराचा पांदण रस्ता वर्धा ते नागपूर (जुना रोड) येथून सुरुवातीपासून वहिवाटीसाठी होता आणि आजही आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी करून सिमेंट पाईप टाकायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळा : जंगलापूर येथील शेतशिवाराचा पांदण रस्ता वर्धा ते नागपूर (जुना रोड) येथून सुरुवातीपासून वहिवाटीसाठी होता आणि आजही आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी करून सिमेंट पाईप टाकायचे आहे. हा रस्ता नाल्यामधून आहे. नाल्याच्या बाजूला पांदण रस्ता असून शेतकरी दिनेश विठोबा तेलरांधे व राजु नत्थुजी वाघमारे यांचे शेत आहे. येथील वाहिवाटच सध्या हरविल्याने तात्काळ संबंधितांकडून मोजमाप करून ती मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
दिनेश तेलरांधे व राजु वाघमारे यांनी पांदण रस्त्याचे काम रोखलेले आहे. त्यामुळे मौक्यावर येवून पांदण रस्त्याची पाहणी करून मोजणी करण्यात यावी व शासकीय जागा खुली करून देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून सतीश धोंगडे, रमेश बजाईत, मनोज तिजारे, नितीन तिजारे, प्रमोद गुजरकर, शरद गुजरकर, रामकृष्ण चांभारे, नरेश गणवीर, प्रवीण गुजरकर, गणपत तळवेकर, अरविंद तळवेकर, देवराव भावरकर, सुनील भावरकर, मधुकर घवघवे, मारूती कांबळे, लिलाधर चांभारे, माणिक तडस, संजय भावरकर, रवीदास तळवेकर, संजय कावलकर, वासुदेव वाटकर, मारुती गुजरकर, गणेश पाहुणे आदींनी केली आहे. सहानुभूतीपुर्वक यावर विचार व्हावा,अशी अपेक्षा आहे.