लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:36 PM2018-02-11T22:36:22+5:302018-02-11T22:36:35+5:30

शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

Development of Pandan Road from Public Sector | लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास

लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : साहूर येथील कामाची पाहणी

ऑनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ते साहूर येथे पांदण रस्त्याची पाहणी करायला आले असता शेतकऱ्यांशी बोलत होते.
यावेळी तहसीलदार सीमा गजभिये, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, पंचायत समिती सदस्य ईश्वर वरकडे, छत्रपती वरकड, उत्तम घारे, पांडुरंग हिवरे, प्रसाद वरकड, प्रवीण टापरे, नितेश ढवळे, शिरीष लाड, राहुल टापरे, रवींद्र खंडार, धनराज खंडार, विठ्ठल टाकळकर, सूरज टापरे, तलाठी शिराळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या समस्याही जाणून घेतल्या.
आष्टी तालुक्यात आगमन होताच जिल्हाधिकाºयांनी वनविभागाच्या परिसराची पाहणी करून वनाधिकारी अमोल चौधरी यांचे कौतुक केले. त्यानंतर वनविभागाने केलेल्या नाला खोलीकरण कामाची पाहणी केली. येथून साहूर येथील पांदण रस्त्याला भेट दिली. जेसीबी मशीन शासनाने उपलब्ध करून दिली आहे. लोकांच्या सहभागातून अल्प रकमेत मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
यानंतर महसूल विभागाच्या बांधकामाला भेटी दिल्या. यामध्ये निकृष्ठ व सुमार दर्जाच्या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाला एवढा निध दिला; मात्र कामाचा दर्जा नीट ठेवला नाही यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. सोबतच बांधकाम विभागाला तात्काळ बांधकामबाबत स्पष्टीकरण मागून कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तहसीलदार गजभिये यांना दिले. जिल्हाधिकारी नवाल यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. यावेळी नायब तहसीलदार रणजित देशमुख, अमोल कदम, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बाळस्कर उपस्थित होते.

Web Title: Development of Pandan Road from Public Sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.