ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.हिंगणघाट, समुद्रपूर येथील वाहतूकदारांनी जुन्या थकबाकीसाठी नवीन शेतमाल गोदामात पोहोचविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व वाहतूकदार यांच्यात चर्चा झाली; मात्र चर्चेचे फलित झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर ढीग लावून तशीच पडून आहे. या तुरीची जोपर्यंत नाफेडच्या गोदामात आवक दाखविली जाणार नाही. तोपर्यंत तिच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होणार नाही. यामुळे शेतकºयांचे चुकारे केव्हा होईल हे सांगणे सध्यातरी अवघड झाल्याचे दिसत आहे.चण्याच्या खरेदीचा मुहूर्त लवकरचशेतकºयांचा चणा बाजारात येणे सुरू झाले आहे. नित्याप्रमाणे शेतकºयांचा शेतमाल येताच त्याचे भाव पडण्याचा प्रकारही झाला. सध्या चण्याला व्यापाऱ्यांकडून ३५०० रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. हा दर शासकीय दराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे निदान हमी भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. ही अपेक्षापूर्ती होण्यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र केव्हा सुरू होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आल्या असून येत्या. एक ते दोन दिवसात जिल्ह्यात चणा खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे.चणा खरेदीचा मुहूर्त साधण्याची तयाारी नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या चुकाऱ्यांचा नवा प्रश्न पुन्हा सामोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शासनाला चन्या द्यावा की व्यापाऱ्यांला या विवंचनेत सध्या शेतकरी असून तो व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.
वाहतुकीच्या समस्येमुळे तुरीचे ढीग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:45 PM
ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा ...
ठळक मुद्देहिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील प्रकार