नवरात्रोत्सवाकरिता दुर्गा मंडळे सज्ज

By admin | Published: October 11, 2015 12:20 AM2015-10-11T00:20:47+5:302015-10-11T00:20:47+5:30

जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला एक परंपरा आहे. त्या परंपरेनुसार शासकीय नियमांना अनुसरून जिल्ह्यातील मंडळे आपापली तयारी करीत आहेत.

Durga Mandals ready for Navratri festival | नवरात्रोत्सवाकरिता दुर्गा मंडळे सज्ज

नवरात्रोत्सवाकरिता दुर्गा मंडळे सज्ज

Next

मातृशक्तीचा जागर : शहरासह जिल्ह्यात नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम
वर्धा : जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला एक परंपरा आहे. त्या परंपरेनुसार शासकीय नियमांना अनुसरून जिल्ह्यातील मंडळे आपापली तयारी करीत आहेत. जिल्ह्याचे आकर्षण ठरणारा नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. यानुसार मंडळांकडून त्यांच्या तयारीलाही वेग आला आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान, वर्धेसह आसपासच्या परिसरातील दुर्गोत्सव मंडळांकडून विविध देखावे तयार करण्याकडे नेहमीच भर राहिला आहे. तर मंडळाच्या परिसर होत असलेल्या विविधरंगी रोषणाईने उजळून निघणार असल्याचे चित्र आहे. यंदा रोषणाई करण्याकरिता नवी लाईटींग व नवे दिवे आणल्याचे दिसून आले आहे. मंडळाकडून होत असलेल्या रोषणाईत वीज चोरी होवू नये याकरिता महावितरणच्यावतीने या मंडळांना कमी दर आकारून वीज मिटर देण्यात येत आहे.
मंडप तयार करताना त्याचा सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून मंडळांना करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या देवीच्या मिरवणुकीचा मार्ग जुनाच ठेवावा, त्या बदल करून नये, अशा सूचना प्रशसनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्ह्यातील मंडळांचे काम सुरू आहे. कृष्णनगर येथील गाडगे महाराज मंदिराशेजारी असलेल्या दूर्गा मंडळाने केलेला देखाचा यंदा आकर्षण ठरणार आहे. तर आर्वी नाका परिसरातील व शास्त्री चौक परिसरातील मंदिर लक्षवेधी ठरणार आहे. शिवाय बाजार परिसरात करण्यात आलेली रोषणाई डोळे दिपवणारी ठरणारी आहे. या व्यतिरिक्त शहरातील देवींच्या मर्तीही आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या आहेत.

Web Title: Durga Mandals ready for Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.