लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कस्तुरबा रूग्नालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने शुक्रवारला कोव्हिड १९ वार्डात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे. आता तिघांची नोंद झाल्याने सेवाग्राम मधील आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातून लोकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण जिंकलेले आहे. या अगोदर संस्थेच्या अभियांत्रिकी विभागाचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला होता. त्या नंतर त्यांची पत्नी पण पॉझिटिव्ह निघाली होती. आता हा आकडा सेवाग्रामसाठी तीनवर गेला आहे.कस्तुरबा दवाखान्यातील बाह्य रूग्न नोंदणी विभागात ३७ वर्षीय पुरूष सेवारत आहे. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ कोरोना वार्डात भर्ती करण्यात आले. तो जुन्या दवाखाना परिसरात राहत असल्याने तो परिसर सील करून शनिवारी त्याच्या परिवारातील सदस्यांना यात्री निवास क्वारंटाईन केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले. सर्वांचे आज स्वॅब घेण्यात आले अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा गोडेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण इरपाते यांनी दिली.
सेवाग्रामच्या कस्तुरबा दवाखान्यातील कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 3:37 PM
कस्तुरबा दवाखान्यातील बाह्य रूग्न नोंदणी विभागात ३७ वर्षीय पुरूष सेवारत आहे. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ कोरोना वार्डात भर्ती करण्यात आले.
ठळक मुद्देसेवाग्राममध्ये तिसरा रूग्ण