८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:13+5:30
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येतून गेल्या आठ वर्षामध्ये ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षीही ऑनलाईन अर्ज नोंदणी झाली असून आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये आठही तालुक्यातील शाळांची नोंदणी झाल्यानंतर त्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करुन सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो. गेल्या आठ वर्षाचा आढावा घेतला असता आरटीईअंतर्गत ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. पहिलीत प्रवेश मिळाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असल्याने आठ वर्षातील पहिली ते आठवी पर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या बघित्ली असता आतापर्यं जवळपास आरटीईअंतर्गत ३० हजार ५१८ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
यावर्षीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून १२४ शाळा सहभागी झाल्या आहे. या शाळांमध्ये नर्सरीकरिता ४८ तर पहिलीकरिता १२९९ जागा रिक्त असून जवळपास ३ हजार १६ अर्ज प्राप्त झाले असून कोणाला प्रवेश मिळते हे सोडतीनंतरच कळणार आहे.
२०१८-२०१९ मध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
आरटीई प्रवेशाकरिता दरवर्षी शाळांची नोेंदणी केली जातात. त्यांनतर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडतीनुसार प्रवेश दिल्या जातो. २०१२-२०१३ पासून तर २०१९-२० या आठ वर्षातील शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास सर्वाधिक प्रवेश २०१८-१९ या सत्रात देण्यात आला. जवळपास १ हजार ४६७ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळाला आहे. तर इतर वर्षाची आकडेवारी बघितल्यास २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षात सर्वात कमी केवळ ५४१ विद्यार्थ्यांनाच मोफत प्रवेश देण्यात आला. त्यासोबतच २०१३-२०१४ मध्ये १ हजार ४, २०१४-२०१५ मध्ये १ हजार १९१, २०१६-२०१७ मध्ये ७३४, २०१७-२०१८ मध्ये १ हजार २०९, २०१८-२०१९ मध्ये १ हजार ४६७ तर २०१९-२०२० मध्ये १ हजार ३१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला
पालकांकडून प्रवेशाकरिता प्रयत्न
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रि येंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जात असून घरापासून जवळच असलेल्या आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शाळांची निवड करुन पालकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त जागेच्या दुप्पट अर्ज दाखल करण्यात आल्याने आपल्याच पाल्याला प्रवेश मिळावा, याकरिता पालकांनी आपले सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे.