लोकार्पण अडले : रामनगर व सावंगी ठाण्यातून कारभारासाठी हालचालींना वेगवर्धा : जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रणाची दिशा देण्याकरिता असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शंभर वर्षाचे झाले. गुन्ह्याचे प्रकार वाढत असल्याने कामाकाजाच्या दृष्टीने ही इमारत आता अपुरी पडत आहे. कामाची गती वाढावी व येणाऱ्या नागरिकांना कामाकरिता त्रास होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस अधीक्षक कार्यालयाकरिता नवी सुसज्ज इमारत बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षाचा कालावधी झाला. केवळ फर्निचर तयार करण्याकरिता निधी उपलब्ध नसल्याने येथून कामकाज सुरू करण्याकरिता अडचण होत असल्याची माहिती आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक तयार करण्यात आलेली नवी इमारत सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. या इमारतीच्या बांधकामसह तिच्या परिसराचाही विकास झाला आहे. येथून पोलीस प्रशासनाचा कारभार आज सुरू होईल, उद्या होईल, या आशेने सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कामकाजाच्या प्रारंभाचा कुठलाही मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून आले आहे. येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बसण्याकरिता कुठलेही फर्निचर नसल्याने इमारतीच्या लोकार्पणाचा मूहुर्त टळत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप हिरवी झेंडी देण्यात आली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. शिवाय या कार्यालयाच्या आवारात हिरवळ कमी असल्याने येथे काम करताना उन्हाचा तडाखा जाणवण्याची भीती काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. येत्या दोन काही दिवसात नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दिवसात राज्यातील सर्वच मंत्री येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दिवसांतच इमारतीचे लोकार्पण होवून तिथे कामकाज सुरू व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षकही त्याच दिशेने करीत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)अनुुदानाकरिता प्रस्तावनव्या इमारतीत तयार करण्यात येणार असलेल्या नव्या फर्निचरकरिता आवश्यक असलेल्या अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून येत्या दिवसात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचे संकेत आहे. ही मंजुरी मिळताच या इमारतीकरिता आवश्यक फर्निचरचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. नव्या इमारतीत काम करताना नव्या फर्निचरची गरज आहे. नवे फर्निचर तयार करण्याकरिता आवश्यक निधी नसल्याने सध्या ते काम रखडले आहे. याकरिता वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इतर दोन्ही ठाण्यातील काम लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यास नव्या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात येईल.-अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा.रामनगरात नव्या ठाण्यासाठी जुन्या इमारतीची डागडुजीशहराचा झालेला विस्तार झाल्याने पोलिसांच्या कार्याच्या कक्षाही रूंदावल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीचा आलेखही वाढीवर आहे. यावर आळा बसविण्याकरिता वर्धा शहरात रामनगर व सेवाग्राम ठाण्याचा भार कमी करण्याकरिता सावंगी येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यांना इमारती मिळाल्या; येथेही प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला नसल्याचे येथेही नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. मात्र या ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नागरिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची माहिती आहे. रामनगर येथील पोलीस ठाण्याकरिता नगर परिषदेच्या मालकीची असलेली एका शाळेची इमारत मिळाली. या इमारतीला पोलीस ठाण्याचे रूप देणे सुरू झाले आहे. येत्या दिवसात हे काम पूर्ण होवून येथे कामकाज सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. सावंगी येथील इमारत पूर्ण झाली असून येथे काम सुरू होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची चर्चा आहे. शिवाय या ठाण्यातून लवकरच काम सुरू करण्याची तयारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून झाल्याची माहिती आहे.
नव्या एसपी इमारतीला फर्निचरची वाट
By admin | Published: December 06, 2015 2:07 AM